3D प्रिंटर पासून इंजिन निर्मिती, 16,000mph मारक क्षमतेचे अमेरिका बनवतोय HyperSonic क्षेपणास्त्र
रेथियॉनचे उद्दिष्ट हे डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी (Defense Advance Research Project Agency) आणि अमेरिकेच्या हवाई दलासाठी क्रूझ मिसाइल (Cruise missile) निर्मिती करणे हे आहे.
शस्त्र निर्मिती क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी रेडियॉन अॅण्ड नॉर्थरॉप ग्रुमॅन (Raytheon And Northrop Grumman) आता एक हायपरसोनिक क्षेपणास्त्र (HyperSonic Missile) निर्मिती करत आहे. या क्षेपणास्त्राचे इंजिन 3 डी (3d Printer Engine) प्रिंडरपासून बनलेले असेल. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता तब्बल 4,600 मैल (16,000mph) प्रतितास इतकी असेल.
डेली मेल या वृत्तपत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, हे क्षेपणास्त्र नॉर्थरॉप कंपनीच्या स्क्रॅमजेट इंजिन टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. कंपनीला आशा आहे की, या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 4,600mph (मॅच 5) असेल. तसेच, क्षेपणास्त्राचे टॉप स्पीड 16,00mph (मॅच 4) इतके असेल. हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र आकाशात कार्यरत राहते. तसेच, आवाजाच्या पाचपट वेगाने पुढे जाते. (हेही वाचा, राफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार)
दरम्यान, रेथियॉनचे अद्ययावत क्षेपणास्त्र प्रणालीचे उपाध्यक्ष थॉमस बसिंग यांनी म्हटले आहे की, कंपनी नजिकच्या काळात फअलाईट टेस्ट करणार आहे. रेथियॉनचे उद्दिष्ट हे डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी (Defense Advance Research Project Agency) आणि अमेरिकेच्या हवाई दलासाठी क्रूझ मिसाइल (Cruise missile) निर्मिती करणे हे आहे. रिथियॉनचा सामना करण्यासाठी अनेक शस्त्र निर्मिती करणाऱ्या कंपन्या हाइपर सॉनिक एयर-ब्रीथिंग वेपन कॉन्सेप्ट (HyperSonic Air-breathing Weapon Concept) विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, अमेरिकेचा संरक्षणावर येत्या काही वर्षात हाइपरसॉनिक शस्त्रांवर अब्जावधी रुपये खर्च करणार आहे