धक्कादायक: जेलमधून चुकून निसटला सर्वात खतरनाक रेपिस्ट; 14 दिवसांत 11 महिलांवर केला बलात्कार
जोसेफ मॅक्केन -वय 34 (Joseph McCann) असे याचे नाव असून, त्याला ब्रिटनमधील सर्वात धोकादायक लैंगिक अपराधी म्हणून ओळखले जात आहे.
ब्रिटनमधील सीरियल बलात्कार (Rape) करणाऱ्या व्यक्तीस 33 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जोसेफ मॅक्केन -वय 34 (Joseph McCann) असे याचे नाव असून, त्याला ब्रिटनमधील सर्वात धोकादायक लैंगिक अपराधी म्हणून ओळखले जात आहे. या व्यक्तीने दोन आठवड्यांत 11 महिला व मुलांचे अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार केला आहे. पीडितांचे वय 11 वर्ष ते 71 वर्षांपर्यंत आहे. त्यातील तीन महिला आहेत, ज्यांना चाकूचा धाक दाखवून रस्त्यावरून अपहरण केले आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला. शुक्रवारी ओल्ड बेलीमध्ये त्याला 37 गुन्ह्यांचा दोषी ठरविण्यात आले.
न्यायमूर्ती एडीस यांनी जोसेफला 33 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जोसेफ हा मुलांसाठी अतिशय धोकादायक आहे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. ओल्ड बेलीमध्ये मॅक्केनला शिक्षा देताना न्यायमूर्ती एडीस यांनी त्याला भ्याड, एक हिंसक गुंडा आणि पेडोफाइल म्हटले. तसेच न्यायाधीशांनी त्याला 'क्लासिक सायकोपैथ' म्हटले असून, मॅक्केनपासून पीडितांचे संरक्षण करण्यात यंत्रणा कशी अपयशी ठरली याचा स्वतंत्र आणि पद्धतशीर तपास केला गेला पाहिजे असे मत त्यांनी नोंदवले. दोषी चोर मॅक्केनला फेब्रुवारी महिन्यात चौकशीनंतर तुरूंगातून सोडण्यात आले होते. (हेही वाचा: 24 वर्षीय हवाई सुंदरीवर बलात्कार, आरोपी निघाला तरुणीचा मित्र)
एप्रिलमध्ये वॅटफोर्डमध्ये अनेक लैंगिक अत्याचार केल्यानंतर मॅक्केन लंडन, ग्रेटर मँचेस्टर आणि चेशाइर येथे गेला. 21 एप्रिलपासून त्याने बलात्कार करण्यास सुरुवात केली. 5 मे रोजी, मॅक्केनने दोन 14 वर्षीय जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचे अपहरण केले. त्यानंतर पोलिसांच्या गस्त वाहनाने त्यांचा पाठलाग केला असता तो पळून गेला. अखेर पोलिसांच्या हेलिकॉप्टरने त्याला शोधले, त्यावेळी तो एका झाडावर चढत होता. 6 मे रोजी त्याला अटक करण्यात आली.