Farmer Protest in India: शेतकरी आंदोलनाचा मुद्दा परदेशात गाजला; पॉप स्टार रिहाना नंतर ग्रेटा थनबर्गनेही केलं शेतकऱ्यांचं समर्थन
तेव्हापासून आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी सातत्याने शेतकरी आंदोलनाबाबतील आपले मत व्यक्त करत आहेत.
Farmer Protest in India: भारतात दोन महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता जगभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. शेतकरी आंदोलनाची यापूर्वीही बर्याच देशात चर्चा झाली. आता अमेरिकन पॉप स्टार रिहाना यांनी शेतकरी आंदोलनाला आपले समर्थन व्यक्त केले. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी सातत्याने शेतकरी आंदोलनाबाबतील आपले मत व्यक्त करत आहेत. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या भारतीय कार्यकर्त्या लिसिप्रिया कांगजूम (Licypriya Kangujam) यांनीही ट्विटरवर शेतकरी आंदोलनाचे उघडपणे समर्थन केले. लिसिप्रियाने जगाला या आंदोलनाचे समर्थन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर लिसिप्रियाने हवामान बदल कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला (Greta Thunberg) याबाबत चर्चा करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी दिलेला सन्मान नाकारल्याने लिसिप्रिया कंगजुम चर्चेत आली होती.
रिहानाच्या ट्विटनंतर ग्रेटा थनबर्गनेही भारतात सुरू असलेल्या शेतकरी चळवळीबद्दल ट्विट केले. ग्रेटा यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, आम्ही भारतातील शेतकरी चळवळीशी एकरूप आहोत. यापूर्वी भारतात NEET परीक्षेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ग्रेटा थनबर्ग यांनी पाठिंबा दर्शविला होता. (Jeff Bezos, Amazon च्या सीईओ पदावरून होणार पायउतार; Andy Jassy होणार नवे CEO)
रिहानाच्या ट्विटनंतर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी आणि संस्थांनी भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. रिहानाच्या ट्विटनंतर ह्युमन राइट्स वॉच, आंतरराष्ट्रीय इंटरनेट हक्कांशी संबंधित संघटना, अमेरिकन मॉडेल अमांडा सेर्नी यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि अनेक नामांकित संस्था व सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान, 32 वर्षांची रिहाना ही शेतकरी चळवळीला पाठिंबा देणारी पहिली जागतिक स्तरीय स्टार आहे. तिने सीएनएन लेखासह ट्विट केलं आहे की, 'आपण याबद्दल का बोलत नाही? #शेतकरी आंदोलन. ट्विटरवर रिहानाचे 100 दशलक्षाहून जास्त फॉलोअर्स आहेत. रिहानाने शेतकरी आंदोलनासमर्थात केललं ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.