शिवरायांच्या नाण्याला जपानमध्ये मानाचे स्थान; द इंटरनॅशनल कॉइन डिझाईन कॉम्पिटिशन 2018मध्ये पुरस्काराने सन्मानीत

रूपल मारुती सावंत (Rupal Sawant) हिने ‘जाणता राजा’ छत्रपती शिवाजी या संकल्पनेवर शिवाजी महाराज नाणे (Shivaji Maharaj Coin) तयार केलेले नाणे सादर केले होते.

Shivaji Maharaj coin | (Photo Courtesy:Japan Mint)

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतासह जगभरातील अनेकांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाण्याला जपानमध्येही मानाचे स्थान मिळाले आहे. द इंटरनॅशनल कॉइन डिझाईन कॉम्पिटिशन 2018 (The International Coin Design Competitiveness 2018) अर्थात आंतरराष्ट्रीय नाणे रचना स्पर्धा 2018मध्ये शिवरायांच्या नाण्याला विशेष पुरस्कार मिळाला आहे. जगभरातील प्रतिभावान व्यक्ती, त्यांची नावे आणि नावीन्यपूर्ण कल्पना घेऊन तयार केलेली नाणी या स्पर्धेत सादर केली जातात. या स्पर्धेसाठी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये (J. J. School of Art) शकणारी मराठमोळी विद्यार्थिनी रूपल मारुती सावंत (Rupal Sawant) हिने ‘जाणता राजा’ छत्रपती शिवाजी या संकल्पनेवर शिवाजी महाराज नाणे (Shivaji Maharaj Coin) तयार केलेले नाणे सादर केले होते.

दरम्यान, स्पर्धेतील अंतिम विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा फेब्रुवारी महिन्यात रंगणार आहे. या सोहळ्याला जाण्यासाठी रुपल आणि सावंत परिवाराने सुरु केली आहे. रुपल हिला इंटेरियर डिझायनर म्हणून करिअर करायचे आहे. तिच्या धडपडीला मामा दीपक कदम आणि तिचे शिक्षक मुंबई कला महाविद्यालयाचे प्राचार्य मुकेश पुरो सर यांनी तिला प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन ककरतात. दीपक कदम हे स्वत:च एक शिल्पकार आहेत. त्यामुळे त्यांच्या मर्गदर्शनाचा फायदा रुपल हिला होतो.

दरम्यान, या स्पर्धेचा इतिहास पाहता आजवर पुरुष शिल्पकारांनीच या स्पर्धेत पुरस्कार पटकावले आहेत. मात्र, हा इतिहास मोडीत काढत रुपल सावंत हिने पुरस्कारावर नाव कोरले आहे. नाणे तयार करण्यासाठी अत्यंत संयम आणि प्रचंड वेळ लागतो. अनेकदा हा वेळ देणे कलाकारांना जमत नाही. परिणामी शिल्पकलेकडे फारच कमी कलाकार आकृष्ठ होतात. परंतु यंदा रूपलने या स्पर्धेत सहभाग घेतला आणि हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला ठरली. दरम्यान, रुपलची निवड व्यावसायिक श्रेणीत झाली आहे. या श्रेणीत युप्रेनचा सेऱही खारूक, ब्राझीलचा जोस कार्लोस ब्रागा, इस्रायलचा ओलेग गावरीझोन आणि पोलंडच्या पॉलिना कोटोवीझ यांच्याही नाण्यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विद्यार्थी श्रेणीची यादी जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात जाहीर होणार असून या श्रेणीतील विद्यार्थ्यांना निवडीचे पत्र पाठवण्यात आले आहे. रुपलच्या या कामगिरीबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.