नवे आश्चर्य; चीनमध्ये बनत आहे जगातील पहिली आडवी इमारत, पहा व्हिडीओ
परंतु चीनमध्ये रॅफेल्स सिटी चोंगकिंग प्रकल्पामध्ये आकाशाला समांतर म्हणजे चक्क आडवी इमारत तयार केली जात आहे
जगामध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगतीबाबत चीन हा विकसित देशांपैकी एक समजला जातो. चीनने अक्षरशः तोंडात बोटे घालायला लागावी अशी आश्चर्ये जगासमोर सादर केली आहेत. आताही एक असाच आगळावेगळा प्रयोग चीन करत आहे. साधारणपणे जमिनीला समांतर अशी गगनचुंबी इमारत उभी केले जाते. परंतु चीनमध्ये रॅफेल्स सिटी चोंगकिंग प्रकल्पामध्ये आकाशाला समांतर म्हणजे चक्क आडवी इमारत तयार केली जात आहे. चीनचा चोंगकिंग प्रकल्प हा जगातील खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट बनला आहे. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा उत्तम मेळ या इमारतीद्वारे साधण्यात आला आहे.
द क्रिस्टल (The Crystal) असे या बिल्डींगचे नाव असून ती, चार इमारतींच्या वर स्थित आहे. 300 मीटर लांबीची ही इमारत जगातील पहिलीच आडवी इमारत ठरली आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प यंग्त्झ आणि जियालिंग नद्या जिथे भेटतात अशा दक्षिण-पश्चिम चिनी शहराच्या मध्यभागी स्थित आहे. हे डिझाइन पारंपारिक चीनी नौकायन जहाजांपासून प्रेरित झाले आहे. (हेही वाचा: इथे सिंगल महिलांना जोडीदाराचा शोध घेण्यासाठी दिली जाते 8 दिवसांची 'Dating Leaves'
रॅफल्स सिटी चोंगकिंग कॉम्प्लेक्समध्ये 230,000 स्क्वॉयर-मीटर शॉपिंग मॉल, 1,400 निवासी अपार्टमेंट, एक लक्झरी हॉटेल आणि 160,000 स्क्वेअर मीटर लव्हिफ ऑफिस स्पेसचा समावेश आहे. आशियाच्या सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या डेव्हलपर कॅपिटालँडने आता या इमारतीच्या आतील भागातील संरचनेवर लक्ष केंद्रित केले आहे. सहा वर्षांपासून काम सुरु असलेल्या या इमारतीचे अंतर्गत काम 2019 च्या दुस-या तिमाहीपर्यंत पूर्ण केले जाईल.