ऐकावं ते नवलचं! विमानतळावर मुलाचं तिकीट मागितल्यानंतर जोडप्याने चिमुरड्याला सोडलं चेक-इन काउंटरवर; काय आहे नेमकी प्रकरण? वाचा

बेल्जियममधील एका जोडप्याने आपल्या मुलासोबत जे केले ते आश्चर्यचकित करणारे आहे. हे जोडपे तेल अवीवहून (Israel's Tel Aviv) ब्रुसेल्सला जाणार होते. ते आपल्या मुलासह विमानतळावर आले होते. मात्र तेथे मुलाचे तिकीट विचारले असता त्यांच्याकडे मुलाचे तिकीट नव्हते. शेवटी, या जोडप्याने मुलाला चेक-इन काउंटरवर (Check-in Counter) सोडलं.

Airport Representational Image (Photo Credits: ANI)

Israel: सर्वच आई-वडिलांना आपलं आपत्य खूपचं प्रिय असतं. मात्र, परदेशात घडलेली एक घटना ऐकल्यानंतर मात्र यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं. बेल्जियममधील एका जोडप्याने आपल्या मुलासोबत जे केले ते आश्चर्यचकित करणारे आहे. हे जोडपे तेल अवीवहून (Israel's Tel Aviv) ब्रुसेल्सला जाणार होते. ते आपल्या मुलासह विमानतळावर आले होते. मात्र तेथे मुलाचे तिकीट विचारले असता त्यांच्याकडे मुलाचे तिकीट नव्हते. शेवटी, या जोडप्याने मुलाला चेक-इन काउंटरवर (Check-in Counter) सोडलं. हे पाहून तेथील कर्मचारी चक्रावले. याबाबत त्यांनी तक्रार केली.

जेरुसलेम पोस्टनुसार, हे जोडपे ब्रसेल्सला जाण्यासाठी तेल अवीवच्या बेन-गुरियन विमानतळावर पोहोचले होते. त्यांना एक लहान मूल होते. त्यांनी त्याचे तिकीट चेक इन करून घेतले. पण रायनएअरच्या कर्मचाऱ्यांनी मुलाचे तिकीट मागितले. मात्र, त्यांच्याकडे मुलाचे तिकीट नव्हते. यावर कर्मचाऱ्यांनी जोडप्याला मुलाचे तिकीट काढण्यास सांगितले. मात्र या जोडप्याला हे मान्य नव्हते. त्यांनी तिकीट घेण्यासही नकार दिला. एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी मुलाला सामावून घेण्यास नकार दिल्याने हे जोडपे मुलाला तिथेच भटकत सोडून विमानाच्या आत गेले. (हेही वाचा - Desh And Bindaas In Oxford Dictionary: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मध्ये आता 'देश','बिंधास्त' सह 800 शब्दांसाठी भारतीय उच्चारणासाठी Pronunciation Transcriptions उपलब्ध होणार)

जोडप्याची ही वृत्ती पाहून विमानतळ कर्मचारी चक्रावले. कर्मचाऱ्यांना हा सर्व प्रकार विचित्र वाटला आणि शेवटी त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. थोड्याच वेळात पोलिसांनी या बाळाच्या पालकाचा शोध घेतला. घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी या जोडप्याला ब्रसेल्सला जाऊ दिले नाही. या जोडप्याला अटक करण्यात आली आहे. मुलाला सोडून पळून जाण्याची काय गरज होती, असा सवाल पोलिसांनी जोडप्याला केला आहे.

चेक-इन काउंटरवर असलेल्या रायनायर डेस्कच्या व्यवस्थापकाने सांगितले की, हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. आम्ही असे काही पाहिले नव्हते. आम्ही जे पाहत होतो त्यावर आमचा विश्वास बसत नव्हता. आम्ही त्या मुलाला आमच्याजवळ ठेवले आणि पोलिसांना कळवले. थोड्यावेळासाठी आम्हाला वाटले की, हे जोडप मुलाची तस्करी करून तर घेऊन जात नाहीत ना?मात्र नंतर कळले की ते मूल या जोडप्याचेचं होते. पोलिस या जोडप्याची अधिक चौकशी करत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now