Israel Attack On Iran: इराणवर इतिहासातील सर्वात मोठा इस्रायली हल्ला! शहरावर क्षेपणास्त्रांचा पाऊस; हवाई संरक्षण यंत्रणा आणि लष्करी तळांना करण्यात आले लक्ष्य

इस्रायली सैन्याने (आयडीएफ) म्हटले आहे की, त्यांनी इराणमधील लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला आहे. इराणकडून यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इराणची राजधानी तेहरानच्या आसपास अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. राजधानीत हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

Israel Attack On Iran (फोटो सौजन्य - X@LegitTargets)

Israel Attack On Iran: इस्रायलने इराणवर मोठा लष्करी हल्ला (Israel Military Attack On Iran) केला आहे. इराणवर शनिवारी झालेल्या हल्ल्याचा बदला इस्रायलने 1 ऑक्टोबरला 200 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांसह (Ballistic Missile Attacks) घेतला आहे. इस्रायलने इलाम, खुजेस्तान आणि तेहरान येथील इराणच्या लष्करी तळांना (Military Bases) लक्ष्य केले आहे. मात्र, इराणने इस्रायलचा हल्ला हाणून पाडल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात इराणचे मर्यादित नुकसान झाले. इस्रायली सैन्याने (आयडीएफ) म्हटले आहे की, त्यांनी इराणमधील लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला आहे. इराणकडून यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इराणची राजधानी तेहरानच्या आसपास अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. राजधानीत हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या कोणत्याही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नाही, असे इराणच्या माध्यमांनी सांगितले आहे.

इस्रायलच्या हल्ल्यांदरम्यान, अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी त्यांचे इस्रायली समकक्ष योव गॅलंट यांच्याशी चर्चा केली आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता. इराणने इस्रायलवर सुमारे 300 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती, त्यापैकी अनेक इस्त्रायलच्या हद्दीत पडली होती. काही क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हवाई तळांवरही पडली. या हल्ल्यांनंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणला प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतली होती. (हेही वाचा -Iran Cyber Attack: इराणच्या आण्विक स्थळांवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग झाले भयभीत)

इस्रायलचे इराणवर सलग तीन वेळा हल्ले -

दरम्यान, Axios च्या रिपोर्टनुसार इस्रायलने इराणवर सलग तीन वेळा हल्ले केले आहेत. तिसऱ्या हल्ल्यात इस्रायलने इराणचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळ आणि उत्पादन केंद्राला लक्ष्य केले आहे. इस्रायलने हवाई संरक्षण यंत्रणा आणि क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांवरही हल्ले केले आहेत. इस्रायलच्या चॅनल 12 नुसार, इस्रायलने पूर्व तेहरान आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स कमांडवर हल्ला केला आहे. यावेळी तेहरानमध्ये अनेक स्फोट ऐकू आले. पूर्व तेहरानमध्ये चार स्फोटांचे आवाज ऐकू आले. (हेही वाचा - Israeli Attacks on Lebanon: लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यातील मृतांची संख्या 2,255 वर पोहोचली)

इस्रायलचा इराणवर हल्ला, पहा व्हिडिओ - 

तथापी, इराणच्या आण्विक साइट्स किंवा तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आलेले नाही, असे इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले आहे. भविष्यात आमच्यासाठी धोकादायक ठरू शकतील अशा लक्ष्यांवर आम्ही हल्ला केला आहे, असंही इस्रायलने म्हटलं आहे. आयडीएफच्या ऑपरेशन डायरेक्टरेटचे माजी प्रमुख, इस्रायल झिव्ह यांनी इराणवरील इस्रायली हल्ल्यांचे वर्णन ऐतिहासिक असल्याचे सांगितले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now