गिफ्ट म्हणून कोट्यावधी रुपये मिळाल्याने 24 वर्षांचा तरुण रातोरात झाला अब्जाधीश; डोनाल्ड ट्रंपपेक्षाही जास्त आहे संपती
चीनमधील सिनो बायो-फार्मास्युटिकलचे (Sino Bio-pharmaceutical) संस्थापक त्से पिंग (Tse ping) आणि त्यांची पत्नी चेउंग लिंग चेंग यांनी आपल्या कंपनीमधील 21.5 टक्के हिस्सेदारी आपल्या मुलाला भेट म्हणून दिली. एरिक त्से (Eric Tse) असे या मुलाचे नाव असून तो अवघा 24 वर्षांचा आहे.
पेनसिल्व्हेनियाच्या (Pennsylvania) व्हार्टन स्कूल ऑफ फायनान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणाच्या जीवनात एका रात्री असे काही घडले की, रातोरात हा तरुण अब्जाधीश झाला. चीनमधील सिनो बायो-फार्मास्युटिकलचे (Sino Bio-pharmaceutical) संस्थापक त्से पिंग (Tse ping) आणि त्यांची पत्नी चेउंग लिंग चेंग यांनी आपल्या कंपनीमधील 21.5 टक्के हिस्सेदारी आपल्या मुलाला भेट म्हणून दिली. एरिक त्से (Eric Tse) असे या मुलाचे नाव असून तो अवघा 24 वर्षांचा आहे. भेट म्हणून दिलेली कंपनीची हिस्सेदारी $ 3.8 अब्ज डॉलर्स, म्हणजे सुमारे 26,980 कोटी रुपये इतकी आहे.
सिनो फार्मास्युटिकलने एरिकला बोर्डाच्या कार्यकारी मंडळामध्ये तसेच कार्यकारी संचालकात समाविष्ट करून घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरिकच्या पालकांनी या आठवड्याच्या सुरुवातीला ही भेट त्याला दिली. एरिकला गिफ्टद्वारे मिळालेला हिस्सा कंपनीच्या भांडवलाचा पाचवा हिस्सा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तो एका वर्षात $5 लाखाहून अधिक कमावेल. कंपनीच्या मते, $ 3.8 अब्ज डॉलर्सच्या भेटवस्तूचा हेतू कुटुंबाची संपत्ती सांभाळणे आणि वारसा हस्तांतरित करणे हा होय. (हेही वाचा: Shocking: उदयनराजे भोसले आहेत अब्जाधीश तर त्यांच्या नावे असलेली एकूण जमीन ही काही देशांच्या क्षेत्रफळापेक्षाही जास्त)
फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीनुसार एरिक आता जगातील 550 क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. एरिकची संपत्ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हॉलीवूडचे दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग आणि स्टारबक्सचे संस्थापक हॉवर्ड शल्त्झ यांच्यापेक्षा अधिक आहे. रिकला हाँगकाँगच्या किमान पाच इतर कंपन्यांमध्ये संचालक म्हणून नियुक्त केले गेले आहे. त्यामुळे त्याच्या संपत्तीमध्ये अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे.