Texas Road Accident: टेक्सासमध्ये भीषण रस्ता अपघात, भारतीय वंशाच्या कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

एक तरुण चालवत असलेल्या मिनीव्हॅनला पिकअप ट्रकने धडक दिली

Accident (PC - File Photo)

Texas Road Accident: टेक्सासमध्ये एका रस्ता अपघातात भारतीय वंशाच्या कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक तरुण चालवत असलेल्या मिनीव्हॅनला पिकअप ट्रकने धडक दिली. मिनीव्हॅन आणि पिकअप यांच्यात जोरदार धडक झाल्याने जागीच सहा जणांचा मृत्यू झाला.   मिनीव्हॅनमध्ये प्रवास करणारे लोक हे अल्फारेटा, जाॅर्जिया येथील रहिवासी होते. मीडिया रिपोर्टनुसार, मिनीव्हॅनमध्ये प्रवास करणारी एक व्यक्ती आणि ट्रक चालक आणि त्याचा साथीदार या अपघातातून सुदैवाने बचावले.  (हेही वाचा- मध्य प्रदेशातील गुना येथे बस आणि डंपरच्या धडेकत भीषण अपघात,)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये नवीना पोटाबथुला, 36, नागेश्वर राव पोनडा, (64), सीतामहालक्ष्मी पोनाडा (60), क्रुतिक पोटाबथुला (10), निशिधा पोटाबथुला(9) यांचा समावेश आहे. डीपीएसने सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या 43 वर्षीय लोकेश पोटाबथुला याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकचा चालक आणि इतर प्रवाश्यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गाडी अनियंत्रित झाल्याने अपघाता झाल्याची माहिती समोर आली. अपघातात मृत झालेले भारतीय वंशाचे मृतदेह हे भारतात पाठवले जाणार आहे. मृतदेह भारतात पाठवण्याची तयारी सुरु  आहे अशी माहिती तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकेचे अशोक कोल्ला यांनी दिली. अपघातात बचावलेला लोकेस याचे सासरे, पत्नी आणि दोन मुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राकेश बारी यांनी पोलिस ठाण्यात सांगितले की, भावाच्या मृत्यूतून त्याची आई सावरू शकत नाही.