Road Accident in Pakistan: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू, 33 जखमी
महामार्गावरून जात असताना बस दरीत कोसळली. या अपघातात ११ जण ठार आणि ३३ जण जखमी झाले आहे.
Road Accident in Pakistan: पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान प्रांतात रविवारी सकाळी अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महामार्गावरून जात असताना बस दरीत कोसळली. या अपघातात 11 जण ठार आणि 33 जण जखमी झाले आहे. बस 70 जणांना घेऊन जात होती. बस पंजाब प्रांतात येत होती त्यावेळी हा अपघात झाला. हेही वाचा- पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; बलुचिस्तानच्या बाजारपेठेत पोलिसांच्या वाहनात ठेवला बॉम्ब; तिघांचा मृत्यू, पोलिसांसह 16 जण जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतातील कराची ते बलुचिस्तान प्रांतातील ग्वादरपर्यंत पाकिस्तानच्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पसरलेला 653 किमीचा राष्ट्रीय महामार्ग मकरन कोस्टल हायवेवर हा अपघात झाला. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश प्रवाशी लाहोर आणि गुजंरावाला येथील होता. अपघाताची माहितीमिळताच, बचाव कार्य सुरु झाले. घटनास्थळी पोलिसांकडून आणि NDRF टीम बचावकार्य करत आहे.
या घटनेतर ३३ जण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री मरियम नवाझ शरिफ यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्त कुटुंबाप्रति शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या या अपघाती घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.