Taliban New Rule: अफगाणिस्तानातील मुली मुलांसोबत शाळेत शिकू शकतात पण सरकारने ठेवली 'ही' अट
तालिबान मधील नव्या सरकारच्या काळजीवाहू उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बकी हक्कानी यांनी असे म्हटले की, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्था आणि युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेता येणार आहे.
Taliban New Rule: तालिबान मधील नव्या सरकारच्या काळजीवाहू उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बकी हक्कानी यांनी असे म्हटले की, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्था आणि युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेता येणार आहे. मात्र मुलींना मुलांसोबत एकाच वर्गात शिकता येणार नाही आहे. म्हणजेच मुलींना वेगळ्या वर्गात शिकावे लागणार आहे. न्यूज एजेंसी सिन्हुआ यांनी हक्कानी यांच्या हवाल्याने रविवारी पत्रकारांना सांगितले की, सर्व सरकारी युनिव्हर्सिटी लवकरच सुरु होतील.(Afghanistan-Taliban Conflict: अफगाणी महिलांना खेळ खेळण्याची परवानगी नाही, तालिबानने लादले निर्बंध)
उच्च शिक्षण अधिकारी नियमांवर काम करत आहेत. त्यानंतरच विद्यार्थ्यांना आपल्या वर्गात परतता येणार आहे. मंत्र्यांनी पुढे असे म्हटले की, मुल आणि मुलींना एकत्रितरित्या शिकता येणार नाही. त्यांना वेगळे केले जाईल. कारण सहशिक्षण योजना इस्लामिक तत्त्वांच्या आणि राष्ट्रीय मूल्यांच्या विरुद्ध आहे. (Afghanistan-Taliban Conflict: तालिबानने अजून एक वचन मोडले, काबूलमधील नॉर्वेजियन दूतावासातील मुलांची फाडली पुस्तके)
हा रिपोर्ट अशावेळी समोर आला आहे जेव्हा अफगाणिस्तान मधील एका महिला विद्यार्थिनीने यंदाच्या वर्षात राष्ट्रीय युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेत उच्च स्थान मिळवले. या वर्षाच्या सुरुवातीला कोविड19 मुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आणि ऑगस्ट मध्ये तालिबान कडून अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाण मधील युनिव्हर्सिटी बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, अफगाणिस्तान मधील काळजीवाहून सरकार कडून घोषणा केल्यानंतर काही आठवड्यांनी ताही खासगी युनिव्हर्सिटी सुरु करण्यात आले.