तैवान: सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हेलिकॉप्टर अपघात, उप-लष्कर प्रमुख Shen Yi-ming यांचा मृत्यू
त्यांच्या हेलिकॉप्टरला पर्वतीय प्रदेशात अपघात झाला.
तैवानचे चीफ ऑफ जनरल स्टाफ (Taiwan Military Chief) शेन यी-मिंग (Shen Yi-ming) यांचा एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (2 जानेवारी 2019) सकाळी घडली. हेलिकॉप्टर अपघात (Helicopter Crash) घडला त्या वेळी Shen Yi-ming (शेन यी-मिंग) यांच्यासोबत एकूण 12 लोक असल्याचे समजते. त्यापैकी शेन यी-मिंग यांच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. प्राप्त माहितीनुसार, हवाई दलाच्या एका हिलेकॉप्टरने शेन यी मिंग हे तैवानची राजधानी तायपेई (Taipei) येथून उत्तर पश्चिमेकडील शहर इलान येथे निघाले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरला पर्वतीय प्रदेशात अपघात झाला.
शेन यी मिंग यांच्यावर तैवानच्या सुरक्षेची जबाबदारी होती. सन 1949 मध्ये झालेल्या गृहयुद्धापासून तैवानला एका स्वतंत्र देशाच्या दर्जा मिळाला आहे. परंतू, चीन तैवानला आपला प्रदेश मानतो. तसेच, सैन्यबळाच्या जोरावर हा प्रदेश चीनमध्ये समाविष्ठ करुन घेण्याची धमकीही देत आला आहे. हेलिकॉप्टर अपघातात शेन यी मिंग यांच्या निधनाची सुरुवातीला पुष्टी झाली नव्हती. मात्र, काही काळानंतर संरक्षण मंत्रालयानेच त्यांच्या मृत्यूची घोषणा केली.
वायु सेना कमांडर इन चीफ सियुंग होउ ची ने तायपेई येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले की, हेलिकॉप्टर दुर्घटनेत शेन यी मिंग यांचा मृत्यू झाला. हा अपघात नेमका कोणत्या कारमामुळे झाला याबाबत मात्र अद्याप पुष्टी होऊ शकली नाही. या अपघाताचे कारण आणि इतर बाबींचा तपास अद्याप सुरु आहे. हा अपघात नैसर्गिक कारणामुळे झाला की, यापाठीमागे काही मानवी चुका आहेत, याचाही तपास केला जाईल, असेही होऊ ची यांनी सांगितले. (हेही वाचा, भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरला भूतानमध्ये अपघात; पायलटचा वाढदिवशी मृत्यू)
शेन यांच्यासोबत काम करणारे संरक्षण मंत्रालयातील माजी उप-मंत्री एड्र यांग यांनी म्हटले आहे की, 'शेन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मृत्यमुळे लष्करात आवश्यक ते फेरबदल केले जातील. मात्र, या सर्व गोष्टींचा 11 जानेवारी रोजी तैवान मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या आणि खासदार निवडीच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. '