Switzerland मध्ये लवकरच मृत्यू कवटाळण्यासाठी फक्त एक बटण दाबण्याचा अवकाश; Portable Suicide Pods द्वारा वैद्यकीय देखरेखीशिवाय घेता येणार जगाचा निरोप

द लास्ट रिसॉर्टच्या सल्लागार मंडळावर असलेल्या वकील फिओना स्टीवर्ट यांनी आम्हांला व्यक्तीला विनासायास मृत्यू कवटाळण्याची प्रक्रिया ही मीडीया सर्कस करण्याची इच्छा नसल्याचं मत दिले आहे.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Switzerland मध्ये पहिल्यांदाच Portable Suicide Pod च्या मदतीने मृत्यूला कवटाळणं सोप्प केलं जाणार आहे. Assisted Dying Group च्या माहितीनुसार लवकरच त्याचा वापर केला जाऊ शकतो. The Last Resort, संस्थेने बुधवारी खुलासा केला की भविष्यातील सारको कॅप्सूलचा काही महिन्यांतच पहिला वापर होऊ शकतो, ज्याने वैद्यकीय निरीक्षणाशिवाय मृत्यू होतो.  स्वित्झर्लंडमध्ये सादर करण्यात आलेले सारको कॅप्सूल (Sarco Capsule), एक विवादास्पद इच्छामरण साधन आहे जे जीवन संपवू पाहणाऱ्या व्यक्तींना शांततापूर्ण आणि वेदनारहित मृत्यू  मिळवून देण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

2019 मध्ये जारी केलेल्या Sarco Capsule एक अंतराळ-युग डिझाइन सादर करते जे ऑक्सिजनच्या जागी नायट्रोजन आणते आणि यामध्ये हायपोक्सियाद्वारे मृत्यू होतो. अत्यंत वाजवी म्हणजे $20 मध्ये ती उपलब्ध केली जात आहे. दरम्यान यामुळे वाद आणि उत्सुकता दोन्ही देखील वाढली आहे. स्वित्झर्लंडमध्ये Sarco capsule च्या वापरासाठी कोणताही कायदेशीर अडथळा नाही.

मरण स्वीकारण्यासाठी फक्त एक बटण दाबा

एका कॅप्सुल मध्ये मृत्यू हवा असलेल्या व्यक्तीला बसवलं जाणार. त्यानंतर लिड बंद होईल. मस्शिन मधून एक प्रश्न विचारला जाईल. ज्यात ते कोण आहेत? ते कुठे आहेत त्यांना माहित आहे का? असे प्रश्न विचारले जातील. तुम्हांला मरायचं असेल तर बटण दाबा अशा सूचना दिल्या जातील.

एकदा बटण दाबल्यानंतर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण 30 सेकंदांपेक्षा कमी कालावधीत 21 टक्क्यांवरून 0.05 टक्क्यांपर्यंत खाली केले जाईल त्यानंतर काही समजायच्या आतमध्येच म्हणजे अंदाजे 2 श्वासामध्येच सारं बदलणार आहे. मृत्यू होण्यापूर्वी सुमारे पाच मिनिटे आधीपर्यंत ते बेशुद्ध अवस्थेमध्ये राहतील. Sarco कॅप्सूलमधील ऑक्सिजन पातळी, व्यक्तीच्या हृदय गती आणि रक्तातील oxygen saturation यावर लक्ष ठेवते. शांतपणे याद्वारा मरण दिलं जाईल. कॅप्सुल मध्ये एकदा बटण दाबल्यानंतर पुन्हा निर्णय मागे घेण्याचा पर्याय नसेल.

पहिल्या मृत्यूची तारीख आणि स्थान किंवा पहिला युजर कोण असू शकतो यावर कोणताही निर्णय झालेला नाही. असे त्यांनी सांगितलं आहे. द लास्ट रिसॉर्टच्या सल्लागार मंडळावर असलेल्या वकील फिओना स्टीवर्ट यांनी आम्हांला व्यक्तीला विनासायास मृत्यू कवटाळण्याची प्रक्रिया ही मीडीया सर्कस करण्याची इच्छा नसल्याचं मत दिले आहे.

भारतामध्ये इच्छामरण शक्य आहे का?

भारतामध्ये active euthanasia procedures ला अजूनही परवानगी नाही. कोणतीही मृत्यूला कवटाळणारी औषधं दिली जात नाहीत. मात्र काही अपवादात्मक स्थितीत passive euthanasia ला परवानगी आहे. ज्यामध्ये लाईफ सपोर्ट काढला जातो. अरूणा शानबाग च्या केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार तो दिला आहे. यामध्ये व्यक्ती आजारपणामुळे बेशुद्धावस्थेमध्ये असल्यास त्यांना जिवंत इच्छापत्राद्वारे संमती द्यावी यासाठी ते अत्यंत आजारी आहेत असे असल्यास मरण दिले जाते. जानेवारी 2023 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने procedural rules सोपे आणि कमी केले आहेत.