US Presidential Election 2024: Sunita Williams आणि Butch Wilmore 2024 च्या यूएस राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये अंतराळातूनच मतदान करणार (Watch Video)
अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहेत, त्याबाबत सुनीता विल्यम्स यांनी त्या आणि बुच विल्मोर हे अवकाशातूनच मतदान करणार असल्याचे म्हटले आहे.
US Presidential Election 2024: अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर गेल्या 3 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर अडकले आहेत. स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधून ते अंतराळात गेले होते, मात्र आता या दोघांशिवाय ते पृथ्वीवर लँड झाले. सुनीता विलियम्स (Sunita Williams)आणि बुच विल्मोर (Butch Wilmore ) हे दोघे मात्र अजूनही अंतराळातच असून फेब्रुवारी 2025पर्यंत ते पृथ्वीवर परततील असे नासाने म्हटले आहे. मात्र, अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्रपती पदाच्या निवडणुका (US Presidential Election 2024) होत आहेत. त्यात सहभाग नोंदवणार असल्याचं सुनीता विल्यम्स यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा: Sunita Williams आणि Butch Wilmore यांचा अंतराळातला मुक्काम फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढला; SpaceX च्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टन परतणार,NASA ने दिली माहिती)
सुनीता विलियम्स यांच्यासोबत बुच विल्मोर हेही अंतराळातच अडकले आहेत. ‘ आम्हाला स्टारलायनर आमच्याशिवाय भारतात जाताना पाहायचं नव्हतं, मात्र तेच घडणार होतं. ते आमच्याशिवायच (पृथ्वीवर) परत जाणार होतं’ असं विल्मोर म्हणाले. ‘आम्ही पुढच्या संधीची वाट पाहत आहोत’ असं सुनीता विलियम्स यांनी नमूद केलं. त्याशिवाय, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर असणे हे त्यांच्यासाठी आनंदाचे ठिकाण असल्याचे सुनीता विलियम्स यांनी म्हटले आहे.
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या मतदानाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. 1997 पासून, NASA अंतराळवीरांनी अंतराळात असतानाही निवडणुकीत भाग नोंदवला आहे. निवडणूकीत सुरक्षित इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली वापरली गेली आहे. मतपत्रिका एनक्रिप्ट केल्या जातात आणि ह्यूस्टनमधील NASA च्या मिशन कंट्रोल सेंटरमधून ISS मध्ये प्रसारित केल्या जातात, जिथे अंतराळवीर ते पूर्ण करतात. एन्क्रिप्टेड मतपत्रिका नंतर काउंटी क्लर्कद्वारे प्रक्रियेसाठी पृथ्वीवर परत पाठवल्या जातात.
स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे, सुनीताविलियम्स आणि बुच विल्मोर या दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्याचे मिशन पुढे ढकलले गेले आहे. त्यानंतर नासाने 24 ऑगस्ट रोजी घोषित केले की सुनीता विल्यम्स आणि विल्मोर फेब्रुवारी 2025 मध्ये, स्पेसएक्सच्या के ड्रॅगन अंतराळयानाद्वारे 8 महिन्यांनंतर परत येतील. सध्या स्टारलायनर हे स्पेसक्राफ्ट दोन्ही अतंरावीरांविनाच पृथ्वीवर लँड झाल आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)