New York City मध्ये Prince Harry-Meghan Markle यांची Paparazzi पासून सुटका मिळवण्यासाठी मदतीला आला भारतीय वंशाचा कॅब ड्रायव्हर!
Duke and Duchess of Sussex यांच्यासोबत मेगन ची आई देखील प्रवास करत होती पण सुदैवाने या प्रकारामध्ये कोणत्याही गाडीला अपघात झालेला नाही. कोणतीही दुर्घटना झालेली नाही.
Prince Harry आणि त्याची पत्नी Meghan यांच्या गाडीचा अमेरिकेतही आता धोकादायक पद्धतीने पाठलाग केला गेल्याची घटना काल घडली आहे. हॅरी आणि मेगनच्या प्रवक्त्यांनी याबबत अधिकृत पत्रक काढून घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान 1997 साली हॅरीची आई Princess Diana यांचे अशाच प्रकारे फोटोग्राफर्सने पाठलाग करताना कार अपघातामध्ये निधन झाले आहे. त्यामुळे हॅरी अशा घटनांबाबत दक्ष राहतो. काल अमेरिकेतही झालेल्या या घटनेनंतर पोलिस स्टेशन मध्ये पोहचलेल्या या जोडप्यांना नंतर एका भारतीय कॅब चालकाने साथ दिल्याचं समोर आलं आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्क मध्ये चॅरिटीचा एक कार्यक्रम आटपून Prince Harry, Meghan आणि तिची आई परतत असताना त्याच्यासोबत गाडीचा पाठलाग केल्याचा समोर आला आहे. त्यानंतर काही काळ ते पोलिस स्टेशन मध्येच थांबले. दरम्यान हॅरी आणि मेगनच्या मदतीला भारतीय वंशाचा कॅब ड्रायव्हर होता. त्याचे नाव Sukhcharn Singh आहे. सुखचरण च्या यलो कॅब मध्ये बसून ते घरी पोहचले. सिंहच्या माहितीनुसार, त्यांच्या गाडीला एका कचर्याच्या ट्रकने अडवलं. त्यानंतर पॅपराझी आले, त्यांनी फोटो काढण्यास सुरूवात केली. सगळा प्रकार पाहून काही काळ ते घाबरल्याचं सिंह यांनी मीडीयाशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान सिंह याच्या दाव्यानुसार, त्यांचा दिवसभर पाठलाग होत होता असे त्याला वाटलं. पण त्याने या प्रकाराला 'पाठलाग' म्हणून शकत नसल्याचं म्हटलं आहे. न्यूयॉर्कमध्ये Prince Harry आणि Meghan Markle यांच्या कारचा धोकादायकपणे केला पाठलाग; मोठा अपघात टळला .
New York City Mayor Eric Adams यांची प्रतिक्रिया
पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. Duke and Duchess of Sussex यांच्यासोबत मेगन ची आई देखील प्रवास करत होती पण सुदैवाने या प्रकारामध्ये कोणत्याही गाडीला अपघात झालेला नाही. कोणतीही दुर्घटना झालेली नाही. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी त्यांचा पाठलाग करणाऱ्या पापाराझींचा “बेपर्वा आणि बेजबाबदार” म्हणून निषेध केला.