55 Chinese Sailors Died: विदेशी जहाजांसाठीच्या सापळ्यात पाणबुडी फसली, 55 चिनी खलाशांचा मृत्यू - रिपोर्ट
पिवळ्या समुद्रात ब्रिटीश जहाजांसाठी लावलेल्या सापळ्यामध्ये चिनीची आण्विक पाणबुडी अडकल्याने जवळपास 55 खलाशांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटीश गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्याने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.
Nuclear Submarine Failed: पिवळ्या समुद्रात ब्रिटीश जहाजांसाठी लावलेल्या सापळ्यामध्ये चिनीची आण्विक पाणबुडी अडकल्याने जवळपास 55 खलाशांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटीश गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्याने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. युकेच्या गुप्तचर विभागाने म्हटले आहे की, जहाजांसाठी लावलेल्या सापळ्यातील साखळी आणि नांगर लागल्याने ही पाणबुडी पुरती अडकली. यामध्ये पाणबुडीचा कॅप्टन 21 अधिकारी आणि 55 चिनी खलाशी मृत्यूमुखी पडले.
सापळ्यात अडकल्यानंतर पाणबुडीत तांत्रिक बिघाड होऊन आपत्तीजनक स्थिती ओढावली असावी. ज्यामुळे संपूर्ण क्रुमेंबर्सना विषबाधा झाली असावी, असा कयास लावला जात आहे. चिनी पीएलए नेव्ही पाणबुडी '093-417' सोबत ही घटना 21 ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पाणबुडी अडकल्याच्या आणि खलाशांचा मृत्यू झाल्याची घटना चीनने फेटाळून लावली आहे. तसेच, अडकलेल्या पाणबुडीसाठी चीनने विदेशी मदतही नाकारली आहे. (हेही वाचा, AUKUS: साम्राज्यवादी चीन विरोधात तीन देशांची आघाडी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिका यांची रणनिती)
यूकेच्या अहवालानुसार प्रसारीत झालेल्या मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 21 ऑगस्ट रोजी पिवळ्या समुद्रातील मोहिमेदरम्यान जहाजावरील अपघातात वरिष्ठ अधिकारी, मध्यम पातळीवरील अधिकारी कॅडेट आणि अगदी किरकोशळ अधिकार असलेले अधिकारी, खलाशी यांच्यासह 55 क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. या सर्वांचा मृत्यू हायपोक्सिया झाल्याने घडला. जो पाणबुडीवरील प्रणालीतील बिघाडामुळे उद्भवणाऱ्या धोक्यामुळे होतो. (हेही वाचा, चीन वेडा बनून खातयं पेढा? जग देतंय कोरोना व्हायरस विरोधात लढा; हिंद महासागरात तैनात चायनीज अंडरवॉटर ड्रोन)
चीनच्या नौदलाने यूएस आणि सहयोगी पाणबुड्यांना अडकवण्यासाठी तैनात केलेल्या साखळी आणि नांगराच्या अडथळ्याशी पाणबुडीची टक्कर झाली. ज्यामुळे प्रणालीमध्ये बिघाड झाला आणि सहा तासांची लढाई पृष्ठभागावर आली. जहाजावरील ऑक्सिजन प्रणाली आपत्तीजनकरित्या निकामी झाल्यानंतर क्रूला विषबाधा झाली. या घटनेचे स्वतंत्र दुजोरा मिळणे बाकी आहे. शिवाय, तैवाननेही हे दावे नाकारले आहेत. अर्थात सार्वजनिक डोमेनमध्ये चिनी पाणबुडीच्या संशयास्पद नुकसानाची कोणतीही स्वतंत्र पुष्टी झाली नाही. बीजिंगने या घटनेबद्दलच्या अनुमानांना पूर्णपणे खोटे असल्याचे सांगत वृत्तही फेटाळून लावले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)