4,000-Year-Old Burial Ground: नेदरलँड्स येथे आढळली चार हजार वर्षांपूर्वीची दफनभूमी, पुरातत्वशास्त्रज्ञांची माहिती
डच पुराततत्व शास्त्रज्ञांच्या (Dutch archaeologists) अभ्यासात एक महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. या माहितीमध्ये शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, त्यांना नेदरलँड्सचे स्टोनहेंज (Stonehenge of the Netherlands) ओळखले जाणारे सुमारे 4,000 वर्षे जुने असे एक धार्मिक स्थळ सापडले आहे. हे स्थळ म्हणजे एक दफनभूमी आहे. याबाबत Phys.org ने दिलेल्या एका अहवालानुसार दफनभूमीचा वापर सैर कॅलेंडर नुसार केला जात असे असेही पुढे आले आहे. या दफनभूमीचा व्यास 65 फुटांचा आहे. ज्यात 60 पुरुष, महिला आणि लहान मुलांचे अवशेष आहे.
पुरातत्व अभ्यासकांनी शोधलेल्या दफनभुमीमध्ये प्राण्यांचे सांगाडे, मानवी कवट्या आणि कांस्य भाला सारख्या मौल्यवान वस्तूंचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार टिएलच्या नगरपालिकेने दिलेल्या निवेदनानुसार ही जागा उत्खनन करण्यात आली होती. जी रॉटरडॅमच्या पूर्वेला सुमारे 70 किमी (45 मैल) होती. (हेही वाचा, बहुसंख्येने मुस्लिम असलेल्या 'या' देशाच्या नोटेवर आहे गणपती बाप्पा)
दरम्यान, यापूर्वी 2017 मध्ये या जागेचे उत्खनन करताना, पुरातत्वशास्त्रज्ञांना अनेक कबरी देखील सापडल्या होत्या. एक कबर मेसोपोटेमिया, सध्याच्या इराकमधून काचेच्या मण्यांसह पुरलेल्या स्त्रीची होती. नेदरलँड्समध्ये सापडलेला हा सर्वात जुना मणी आहे आणि संशोधकांनी सांगितले की, या भागातील लोक जवळपास 5,000 किमी दूर असलेल्या लोकांच्या संपर्कात होते.
उल्लेखनी असे की, पाषाणयुग, कांस्ययुग, लोहयुग, रोमन साम्राज्य आणि मध्ययुगातील एक दशलक्षाहून अधिक उत्खनन केलेल्या वस्तूंचे संशोधन करण्यासाठी पुरातत्वशास्त्रज्ञांना सहा वर्षे लागली. उत्खनन पूर्ण झाल्यानंतर, बांधकामाला परवानगी देण्यासाठी पुन्हा जागा झाकण्यात आली होती. दरम्यान, यातील काही शोध टिएल येथील स्थानिक संग्रहालयात आणि डच नॅशनल म्युझियम ऑफ अॅन्टिक्विटीजमध्ये प्रदर्शित केले जातील.