IPL Auction 2025 Live

Yemen Stampede: येमेनच्या राजधानीत चेंगराचेंगरीची घटना, 78 नागरिकांचा मृत्यू

यावेळी व्यापाऱ्यांकडून नागरिकांना पैशांचं वाटप केलं जात होतं. यावेळी नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

Yemen Stampede (Image Credit ANI - Twitter)

येमेनची राजधानी साना येथे एका कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली.  या चेंगराचेंगरीत 78 नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापाऱ्यांकडून नागरिकांना पैशांचं वाटप केलं जात होतं. यावेळी नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. या गर्दीनंतर याठिकाणी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 78 जणांनी आपले प्राण गमावले. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

येमेनच्या मंत्रालयाचे प्रवक्ते ब्रिगेडियर अब्देल - खलेक यांनी स्थानिक प्रशासनाशी कोणताही समन्वय न साधता असा निधी वाटपाच्या कार्यक्रमावर नाराजगी व्यक्त केली. ईद अल-फितरच्या पुर्वी ही घटना घडली आहे. या आठवड्याच्या अखरीस पवित्र रमजान महिना संपत आहे.

दरम्यान अनेक जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सना येथील वरिष्ठ आरोग्य अधिकारी मोताहेर अल-मारौनी यांनी मृतांची माहिती दिली. बंडखोरांनी त्वरीत शाळा बंद केली जेथे कार्यक्रम आयोजित केला होता आणि पत्रकारांसह लोकांना येण्यापासून प्रतिबंधित केले.

प्रत्यक्षदर्शी अब्देल-रहमान अहमद आणि याहिया मोहसेन यांनी सांगितले की, सशस्त्र हुथींनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात हवेत गोळी झाडली, ती गोळी विजेच्या तारेवर आदळली आणि त्याचा स्फोट झाला. त्यामुळे घबराट पसरली आणि लोक  इथे तिथे पळू लागले यामुळे चेंगराचेंगरी घडली.