कोरोनाच्या खुलासापूर्वी वुहान लॅबमधील कर्मचारी पडले आजारी, रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा रिपोर्ट्स मधून खुलासा

नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे, कोरोना विषाणूचा सुरुवात ज्या लॅब मध्ये झाली असे सांगितले जात आहे त्या वुहानमधील लॅबमधील तीन कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जेव्हा कोरोनाबद्दल कोणालाही माहिती न्हवते.

Representative image

गेल्या दीड वर्षांपासून जगातील कोरोना या साथीच्या आजारामुळेअगदी सुरुवातीपासून ते अजूनही वाद आहे. या सगळ्यासाठी जगाने चीनला जबाबदार धरले आहे, परंतु चीन या गोष्टीला नाकारत आहे.दरम्यान, आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे, कोरोना विषाणूचा सुरुवात ज्या लॅब मध्ये झाली असे सांगितले जात आहे त्या वुहानमधील लॅबमधील तीन कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जेव्हा कोरोनाबद्दल कोणालाही माहिती न्हवते. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO ) आता कोरोनाच्या जन्माच्या तपासणीच्या दिशेने एक नवीन पाऊल उचलत आहे, जेणेकरुन रूग्णालयात जाणाऱ्या वुहान लॅबच्या तीन कर्मचार्‍यांकडून मिळालेली माहिती तपासात मदत करू शकेल.

रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 2019 मध्ये वुहान लैब चे तीन कर्मचारी आजारी पडले आणि त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नोव्हेंबर 2019 च्या नंतरच डिसेंबर- जानेवारीच्या दरम्यान जगाला कोरोना महामारीच्या विषाणूची माहिती मिळाली होती. (Vaccine Tourism in Russia: 1.30 लाखात रशियाची 24 दिवसांची ट्रीप आणि Sputnik V चे दोन डोस; भारतीयांसाठी ट्रॅव्हल्स कंपनीचे पॅकेज सुरू )

ट्रम्प प्रशासनाच्या वेळेच्या अहवालात दावा

अमेरिकन वृत्तपत्राने असा दावा केला आहे की डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या शेवटच्या दिवसांत तयार केलेल्या अहवालात या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.दरम्यान अमेरिकेच्या सरकारने अद्याप या अहवालावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.परंतु त्याच वेळी असे म्हटले आहे की,अमेरिका कोरोनाच्या प्रारंभाच्या तपासास पाठिंबा दर्शवितो आणि त्यासाठी चीनलाही जबाबदार धरत आहे. वृत्तपत्राच्या अहवालानंतर चीनच्या वतीने मौन पाळले गेले आहे. वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाने या रिपोर्टवर कोणतेही भाष्य केले नाही.चीन यापूर्वी कोरोनाविषयीच्या प्रश्नांना टाळाटाळ करीत स्वत: ला निर्दोष सांगत आला आहे.WHO ची एक टीम कोविड -19 च्या उत्पत्तीची चौकशी करीत आहे,दरम्यान चीनला आढळलेल्या सुरुवातीच्या प्रकरणांची माहिती देण्यात नकार दिला आहे. कोविड -10 च्या उत्पत्तीबद्दल विवाद अजूनही सुरू आहे.अमेरिकेसह जगातील बर्‍याच मोठ्या देशांनी चीनला यासाठी जबाबदार धरले आहे.आणि असा दावा केला की ही वुहानच्या लॅब मध्येच त्याला तयार करण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

BAN W vs NEP W, ICC Women's U19 T20 World Cup, 2025 Scorecard: अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात बांगलादेशची विजयाने सुरुवात, नेपाळवर 5 विकेट्सने केली मात; सामन्याचा स्कोअरकार्ड येथे पाहा

ICC U19 Women's T20 World Cup Live Streaming: आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाला आजपासून सुरुवात, भारतात कधी अन् कुठे घेणार थेट सामन्याचा आनंद; घ्या जाणून

Ira Jadhav Triple Century: मुंबईच्या मुलीची कमाल! महिला अंडर 19 एकदिवसीय करंडक स्पर्धेत झळकावले त्रिशतक, स्मृती मानधनाचा विक्रम मोडला

What Is HMPV Virus? How Does It Spread? एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे काय? तो कसा पसरतो? लक्षणांपासून कारणांपर्यंत आणि संक्रमणापासून उपचारांपर्यंत, मानवी मेटान्यूमोव्हायरसबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक

Share Now