Sri Lanka मध्ये बुरखा बंदी; हजारो इस्लामिक शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय

देशातील अलपसंख्याक मुस्लिम लोकसंख्येवर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) बुरखा (Burqa) घालवण्यावर बंदी घालण्यात येणार असून हजाराहून अधिक इस्लामिक शाळा (Islamic schools) बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती सरकारी मंत्र्यानी आज (शनिवार, 13 मार्च) दिली. या निर्णयाचा परिणाम देशातील अल्पसंख्याक मुस्लिम लोकसंख्येवर होणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत संपूर्ण चेहरा झाकून घेण्यावर बंदी घालण्यात आल्याचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री सारथ वीरेसकेरा (Sarath Weerasekera) यांनी सांगितले.

सार्वजनिक सुरक्षा मंत्री सारथ वीरेसकेरा पत्रकार परिषदेत म्हणाले की, "काही मुस्लिम महिलांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण चेहरा झाकून घेण्यावर बंदी घालण्याच्या मंत्रिमंडळाच्या मंजुरी ठरावावर शुक्रवारी मी स्वाक्षरी केली."  हजारो पेक्षा अधिक मदरशा इस्लामिक शाळांवर बंदी घालण्याची सरकारची योजना असल्याचे वीरेसकेरा यांनी सांगितले. कोणीही शाळा सुरु करुन हवे ते मुलांना शिकवू शकत नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

"पूर्वीच्या काळात मुस्लिम स्त्रिया व मुली कधीही बुरखा घालत नसतं. परंतु, अलिकडच्या काळात जे काही दिसते ते धार्मिक अतिरेकीपणाचे लक्षण आहे. आम्ही नक्कीच यावर बंदी घालणार आहोत," असेही ते म्हणाले. (श्रीलंकेत बॉम्ब स्फोट हल्ल्यानंतर बुरखा- नकाबवर बंदी, राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांचा आदेश)

देशाच्या उत्तरेकडे चालू असलेल्या खूप वर्षांच्या बंडखोरीला मोडून काढणारे संरक्षण मंत्री गोतबया राजपक्षे हे वर्षाच्या शेवटी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. युद्धादरम्यान त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. परंतु, त्यांनी ते आरोप फेटाळून लावले आहेत.

इस्लामिक दहशतवाद्यांनी चर्च आणि हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट केल्यानंतर बहुसंख्य बौद्ध देशांनी 2019 मध्ये बुरखा परिधान करण्यास तात्पुरती बंदी घातली होती. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात 250 पेक्षा अधिक ठार झाले होते.

मागील वर्षी कोविड-19 संकटामुळे सर्व धर्मातील मृत व्यक्तींचे अग्निदहन करण्यात आले. हे तिथल्या मुस्लिम व्यक्तींच्या इच्छेविरुद्ध होते. दरम्यान, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय हक्क गट यांच्या टीकेनंतर या वर्षाच्या सुरूवातीस ही बंदी उठविण्यात आली आहे.