Sri Lanka Serial Blasts: श्रीलंका मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पॅरिस मधील Eiffel Tower वरील रोषणाई बंद (Video)
काल (21 एप्रिल) ईस्टर सन्डे दिवशी श्रीलंकेत झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटाने श्रीलंकेसह संपूर्ण जगही हादरुन गेले.
काल (21 एप्रिल) ईस्टर सन्डे दिवशी श्रीलंकेत (Shrilanka) झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटाने श्रीलंकेसह संपूर्ण जगही हादरुन गेले. या दुर्घटनेत तब्बल 290 जणांना आपला जीव गमवावा लागला. यात 3 भारतीय नागरिकांसह परदेशी नागरिकांचाही समावेश होता. तर या हल्ल्यात 450 लोक जखमी झाले आहेत. या धक्कादायक घटनेनंतर हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरवरील रोषणाई बंद करण्यात आली. (श्रीलंका येथील साखळी बॉम्ब स्फोटाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तीव्र शब्दांत निषेध, भारतीयांसाठी हेल्पलाइन सुरु)
ANI ट्विट:
कोलंबो शहारात झालेले हे बॉम्ब हल्ले प्रामुख्याने चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये करण्यात आले. काल ईस्टर सन्डे असल्याने मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये येऊन येशूची प्रार्थना करतात. त्यामुळे चर्च हल्लेखोऱ्यांच्या निशाण्यावर होते.