Sri Lanka Inflation: श्रीलंकेत महागाईचा भडका, टॉमेटो 200 रुपये किलो तर मिर्चीचे दर 700 च्या पार

कारण सध्या श्रीलंकेत नियमतपणे खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर तुफान वाढले गेले आहेत. येथे एका महिन्यात खाण्यापिण्याच्या गोष्टी 15 टक्क्यांपर्यंत महागल्या आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Sri Lanka Inflation: भारताच्या शेजारील देश श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर पोहचत चालला आहे. कारण सध्या श्रीलंकेत नियमतपणे खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर तुफान वाढले गेले आहेत. येथे एका महिन्यात खाण्यापिण्याच्या गोष्टी 15 टक्क्यांपर्यंत महागल्या आहेत. 100 ग्रॅम मिर्चीचे दर 71 रुपये झाले आहेत. म्हणजेच एक किलो मिर्ची 700 रुपयांहून अधिक किंमतीत विक्री केली जात आहे. महिन्याभरात मिर्च्यांच्या किंमती 250 टक्क्यांनी वाढल्या गेल्या आहेत.

त्याचसोबत भाज्यांचे दर सुद्धा वाढल्याने त्याचा सर्वसामान्यांवर मोठा प्रभाव पडला आहे. जवळजवळ 2.2 कोटी लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेत सध्या इतिहासातील सर्वाधिक मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस त्याचा परकीय चलन साठा सुमारे $1.6 अब्ज इतका घसरला होता, जे केवळ काही आठवड्यांच्या आयातीसाठी पुरेसे होते. याच कारणामुळे सरकारला काही आवश्यक वस्तूंच्या आयातीवर बंदी लावण्यास भाग पाडले. त्यामुळेच खाद्यपदार्थ आणि अत्यावश्यक गोष्टींच्या किंमतीत वाढ झाली.

श्रीलंकेत गेल्या चार महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत जवळजवळ 85 टक्के वाढ झाली आहे. आयातीवर बंदी घातल्याने दुधाच्या किंमतीत ही मोठी वाढ झाली आहे.(Viral Video: ​तलावात बोटिंग करत असलेल्या लोकांवर अचानक कोसळली दरड; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ)

>>वांगी - रु 160/किलो

>>कारले - रु 160/किलो

>>भेंडी - रु 200/किलो

>>टोमॅटो - 200 रु./किलो

>>कोबी - 240 रुपये/किलो

>>बीन्स- 320 रुपये/किलो

तज्ञांनी सांगितले की 2019 मध्ये श्रीलंकेने पर्यटनातून सुमारे $ 4 अब्ज कमावले, परंतु जागतिक महामारीमुळे सुमारे 90% प्रभावित झाले आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्था देखील अधिक कमकुवत झाली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना 31 वर्षीय निलुका दिलरुक्षी सांगतात की, पूर्वी ती आपल्या मुलांना दररोज मासे आणि भाज्या द्यायची. आता आम्ही त्यांना भातासोबत भाजी देत ​​आहोत. त्यांनी सांगितले की, पूर्वी आम्ही दिवसातून तीन वेळा खायचो पण आता कधी कधी फक्त दोनदाच जेवतो.