श्रीलंका बॉम्ब स्फोटाप्रकरणी दोघांना केरळ येथून अटक

त्यानंतर या प्रकरणाची अधिक तपासणी सुरु झाली असून दिवसेंदिवस नवीन खुलासे हल्ल्याबद्दल केले जात आहेत

राष्ट्रीय सुरक्षा पथक (फोटो सौजन्य-ANI)

राष्ट्रीय सुरक्षा पथका. तर एनआयए (NIA) यांनी केरळ येथून दोघांना अटक केली आहे.

अबु बाकर सिद्दकी आणि अहमद अराफथ अशी दोन तरुणांची नावे आहेत. या दोघांकडून मोबाईल फोन आणि सीमकार्ड जप्त केले असून अधिक तपासणी करण्यात येत आहे. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार केरळातील कारसगोड जिल्ह्यातून या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर ज्या ठिकाणहून दोघांना अटक करण्यात आली आहे तेथील अनेक तरुण अफगाणिस्तान येथील दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. या दोघांचा संबंध श्रीलंका बॉम्ब स्फोट हल्ल्याचा सूत्रधार जहरान हाशीम याच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Sri Lanka Serial Bomb Blasts: न्यूझीलंड येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेत बॉम्बस्फोट; ISIS ने स्वीकारली जबाबदारी)

तर रविवारी (28 फेब्रुवारी) एनआयएने केरळात तीन ठिकाणी छापेमारी केली. त्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांवर आयसीसच्या संपर्कात आधीपासून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.