South Korea Plane Crash: दक्षिण कोरियात मोठी विमान दुर्घटना; 179 प्रवाशांना आपघातात मृत्यू

जेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले. आपघातात 179 प्रवाशांना आपघातात मृत्यू झाला. विमानात एकूण 181 लोक होते, ज्यात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.

Photo Credit- X

South Korea Plane Crash: दक्षिण कोरियात (South Korea) विमान अपघातात 179 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले ते अनियंत्रित झालं आणि भिंतीला धडकलं. त्यानंतर विमानाने पेट घेतला. अपघातावेळी विमानात एकूण 181 प्रवाशी होते. ज्यात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. या अपघातात फक्त 2 जणांचा जीव वाचला. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या बचावकार्य सुरू आहे.

लँडिंगदरम्यान भिंतीवर आदळले 

मिळालेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे हे विमान थायलंडहून परतत होते. दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर उतरताना विमान घसरले आणि भिंतीवर आदळले. भिंतीवर आदळताच विमानाने पेट घेतला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 179 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी 32 फायर इंजिन आणि हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले होते. वाचलेल्या दोघांची परिस्थीती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

लँडिंग गिअरमध्ये बिघाड 

प्राथमिक माहितीनुसार, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय अग्निशमन यंत्रणेने सांगितले की, अपघातानंतर लागलेली आग जवळपास विझवण्यात आली आहे. वृत्त लिहेपर्यंत बचावकार्य सुरूच होते. विमानाच्या ढिगाऱ्यातून प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. सध्या बचाव मोहिमेदरम्यान दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. त्यात एक प्रवासी आणि एका चालकाचा समावेश आहे.

विमान 15 वर्ष जुनं होतं

परिवहन मंत्रालयाने अपघातावर म्टले आहे की, 'अपघात झालेलं विमान हे 15 वर्ष जुनं होतं. विमान हे बोइंग 737-800 जेट होतं. आज सकाळी 9 वाजून 3 मिनिटाच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. अग्निशमन दलाने सांगितलं की, अपघातानंतर आग लागून झालेल्या दुर्घटनेत 174 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून 2 जणांचा जीव वाचला आहे'.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement