Sir Lan Wilmut Passes Away: सर लॅन विल्मुट यांचे निधन, जगातील पहिल्या Cloned Sheep Dolly चा निर्माता हरपला

प्रोफेसर लॅन विल्मुट यांनी 5 जुलै 1996 रोजी आपल्या सहकाऱ्यांना सोबतघेऊन इंडेनबर्ग विद्यापीठातील रोस्लीन इन्स्टीट्यूमध्ये डॉली मेंडीचे पहिले क्लोन बनविले. त्यांच्या कार्याने स्टेम सेल संशोधनाचा पाया घातला. त्यांच्या प्रयोगापूर्वी प्राण्यांचे क्लोनिंग भ्रूण पेशींपासून बनविले जात असे. मात्र, एका स्थन पेशीपासून प्रथमच क्लोनिंग करण्यात आले आणि डॉली मेंडीचा जन्म झाला.

Ian Wilmut | (Photo credit: archived, edited, representative image)

Creator of World's First Cloned Sheep Dolly Dies: मेंडीचे जगातील पहिले क्लोन तयार करणारे शास्त्रज्ञ सर लॅन विल्मुट ( Sir Lan Wilmut Passes Away) यांचे निधन झाले आहे. ते 79 वर्षांचे होते. त्यांनी क्लोनद्वारे निर्माण डॉली नावाच्या मेंडीची जगभर चर्चा होती. सहाजिकच या प्रयोगासाठीच त्यांना जगभरात अधिक ओळखले गेले. मात्र, त्याहीपलीकडे त्यांनी अनेक विषयांमध्ये मोठे काम केले आहे. द गार्डीयनने दिलेल्या वृत्तानुसार, प्रोफेसर लॅन विल्मुट यांनी 5 जुलै 1996 रोजी आपल्या सहकाऱ्यांना सोबतघेऊन इंडेनबर्ग विद्यापीठातील रोस्लीन इन्स्टीट्यूमध्ये डॉली मेंडीचे पहिले क्लोन बनविले. त्यांच्या कार्याने स्टेम सेल संशोधनाचा पाया घातला. त्यांच्या प्रयोगापूर्वी प्राण्यांचे क्लोनिंग भ्रूण पेशींपासून बनविले जात असे. मात्र, एका स्थन पेशीपासून प्रथमच क्लोनिंग करण्यात आले आणि डॉली मेंडीचा जन्म झाला.

सर लॅन विल्मुट यांना सायंटीफीक जगताचे टायटन म्हणून ओळखले जात असे. प्रिन्सीपल आणि इंडेनबर्ग विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर पीटर यांनी त्यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, त्या काळातील वैज्ञानिक विचार बदलला. ते प्रदीर्घ काळापासून जवळपास 1960 पासून एॅनिमल सायन्स आणि क्रायोप्रिजर्वेशन सायन्स क्षेत्रात काम करत होते. (हेही वाचा, Buffalo Breeding: गुणसूत्र विर्यकांड्या वापरून कृत्रिम रेतन, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे आता फक्त गाई, म्हशीच जन्मणार)

बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, प्रोफेसर लॅन विल्मुट आणि त्यांच्या टीमने सहा वर्षांच्या फिन डोर्सेट मेंढीची स्तन ग्रंथी (डीएनए) आणि स्कॉटिश ब्लॅकफेस मेंढीपासून घेतलेल्या एग्ज सेलचा वापर केला आणि त्यांना एकत्र केले. त्यानंतर अभ्याकांनी ही पेशी (सेल) काही काळ काही रसायनांचा वापर करुन विशिष्ट्य विद्युत दाबात उबवली. ज्याने प्रौढ डीएनएला भ्रूणात पुनरुज्जीवित करण्यात मदत केली. डॉलीचा जन्म ही 20 व्या शतकातील सर्वात मोठी वैज्ञानिक कामगिरी मानली जात होती.

बीबीसीच्या आणकी एका रिपोर्टनुसार "आमच्या आदर्शांच्या आणि समाजाच्या मुळाशी असलेल्या पवित्र कौटुंबिक बंधनांना धोका निर्माण करण्याची क्षमता तंत्रज्ञानामध्ये आहे," असे म्हणत अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी तर मानवी क्लोनिंगच्या प्रयोगांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. मात्र, पुढे प्रोफेसर लॅन विल्मुट यांनी नंतर प्रसारमाध्यामांना सांगितले की डॉलीची निर्मिती मानवतेच्या भल्यासाठी होती. यामुळे दुर्बल आजारांवर उपचार शोधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now