Shooting at Bangkok Shopping Mall: Siam Paragon Mall मध्ये गोळीबारात 3 ठार, 4 जखमी; 14 वर्षीय आरोपी अटकेत

थायलंडच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित दिवसांपैकी एक घटनेला वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी आता हा शॉपिंग मॉलमध्ये गोळीबाराचा प्रकार समोर आला आहे.

gun shot representative image

Bangkok मधील शॉपिंग मॉल मध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. आज (3 ऑक्टोबर) झालेल्या गोळीबाराच्या या घटनेमध्ये 14 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. हा गोळीबार स्थानिक वेळेच्या संध्याकाळी 5 च्या सुमारास झाला आहे. Siam Paragon Mall मधील गोळीबाराच्या घटनेने पुन्हा शहर हादरलं आहे.

स्थानिक अथॉरिटीकडून संशियिताला शस्त्रासह अटक केली आहे. Thailand Prime Minister Srettha Thavisin यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने स्वतःहून सरेंडर केले आहे. Siam Paragon Mall मधील स्थिती आता पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर पूर्ववत केली जात आहे.

गोळीबाराचा जसा आवाज येऊ लागला तशी मॉलमधील लोकांची देखील धावपळ झाली. अनेक जण जीव मूठीत घेऊन सैरावैरा धावत होते. थायलंडच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित दिवसांपैकी एक घटनेला वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी आता हा शॉपिंग मॉलमध्ये गोळीबाराचा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये , जेव्हा चाकू आणि बंदुकीसह सशस्त्र एका माजी पोलीस अधिकाऱ्याने नर्सरीवर हल्ला केला होता. त्यामध्ये 12 प्रौढ आणि 24 मुलांचा मृत्यू झाला होता.

थायलंडमध्ये बंदुकांची मालकी या प्रदेशातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत जास्त आहे. स्वित्झर्लंड-आधारित स्मॉल आर्म्स सर्व्हे (एसएएस) च्या 2017 च्या आकडेवारीनुसार, थायलंडमध्ये 10.3 दशलक्षाहून अधिक नागरिकांनी बंदुक बाळगली आहे. SAS ने पुढे उघड केले की त्यापैकी सुमारे 6.2 दशलक्ष गन्स या कायदेशीररित्या नोंदणीकृत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, थायलंडमध्ये सामूहिक गोळीबार दुर्मिळ आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये, थायलंडमधील चाइल्ड केअर सेंटरमध्ये बंदूक आणि चाकू हल्ल्यात किमान 36 लोक ठार झाले होते.