Shocking! पती झोपेत असताना पत्नीने कात्रीने कापले त्याचे Penis; इतर महिलांमध्ये तो लोकप्रिय असल्याचा रागातून घडले कृत्य
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

पती-पत्नीमधील नातेसंबंध हे प्रेम आणि विश्वास यावर अवलंबून असतात. या नात्याबाबत थोडा जरी संशय किंवा शंका मनात आली तर, नात्यात कटुता यायला लागते. आता व्हिएतनाममध्ये (Vietnam) राहणाऱ्या जोडप्यामध्ये असाच संशय निर्माण झाला, ज्यामुळे आज पती रुग्णालयात आहे. महत्वाचे म्हणजे पत्नीने स्वतः पतीला रुग्णालयाचा रस्ता दाखवला आहे. स्थानिक वृत्तपत्र व्हीएन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पत्नीने आपला 40 वर्षीय पती झोपेत असताना त्याचे लिंग (Penis) कात्रीने कापले. आपल्या पतीला अनेक महिला मित्र असल्याच्या रागातून पत्नीने हे कृत्य केले आहे.

रिपोर्ट्सनुसार, आपला पती इतर महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे याच इर्षेमधून पत्नीने त्याला धडा शिकवण्यासाठी तो झोपेत असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या पतीचे बरेच महिला मित्र होते. तो या मैत्रिणींसोबत नेहमी फोनवर बोलत असे, त्यांना बाहेर भेटत असे. बायकोला हे अजिबात पसंत नव्हते. याविषयी तिने पतीशी बर्‍याचवेळा बोलणे केले होते, परंतु पत्नी फक्त शंका घेत आहे म्हणून पती तिच्या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचा. एके रात्री आपला पती गाढ झोपला आहे हे पाहून, तिने त्याला धडा शिकवण्यासाठी कात्रीने त्याचे पेनिस कापले. अनेक तासांनंतर तिने त्याला रुग्णालयात दाखल केले.

महिलेने आपल्या पतीला व्हिएतनाममधील चो रे रुग्णालयात दाखल केले होते. जेव्हा ती पतीला घेऊन तिथे गेली तेव्हा पती रक्ताने माखला होता. महिलेने पतीचा प्रायव्हेट पार्ट डॉक्टरांच्या हातावर ठेवला व तो जोडण्यास सांगितला. हॉस्पिटलच्या यूरोलॉजी विभागाचे डॉ. नुग्येन थान तुआन म्हणाले की, टीम या प्रकरणावर सातत्याने नजर ठेवून आहे. आमच्या टीमने खाजगी भाग परत जोडला आहे, परंतु अजूनही त्यात संसर्गाचा धोका खूप जास्त आहे. आता या व्यक्तीची प्रकृती ठीक आहे आणि तो बरा होत आहे.