Sexual Abuse: गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षिकेने केले अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण, फोनवर पाठवले अश्लील मेसेज, 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

तिने 13 ते 14 वयोगटातील किमान तीन मुलांचे लैंगिक शोषण केले होते.

प्रातिनिधिक-संग्रहित-संपादित प्रतिमा

Sexual Abuse: अमेरिकेतील आयोवा (Iowa) येथे गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या शाळेतील एका नवविवाहित शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याची कबुली दिली आहे. ही बाब समोर आल्यानंतर या महिलेला नोकरीवरून काढून टाकले, तसेच तिचा विवाहदेखील संपुष्टात आला. न्यायालयाने महिलेला 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

फॉक्स न्यूजनुसार, आयकेएम मॅनिंग स्कूलमधील 24 वर्षांची शिक्षिका कॅसिडी क्रॉस (Cassidy Kraus) हिने कमीतकमी तीन मुलांवर लैंगिक अत्यचार केले आहेत. 24 जुलै रोजी ही बाब समोर आली. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी क्रॉसच्या पतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. घटस्फोट दाखल होण्याच्या तीन दिवस आधी शाळेने आपल्याला कामावरून काढण्याआधीच क्रॉसने राजीनामा दिला.

क्रॉसला अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण, शाळेतील दोन मुलांसोबत अश्लील कृत्य करणे आणि अल्पवयीन मुलांमध्ये अश्लील साहित्य प्रसारित केल्याच्या  गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले. तिने 13 ते 14 वयोगटातील किमान तीन मुलांचे लैंगिक शोषण केले होते आणि त्यांना अश्लील स्नॅपचॅट संदेश पाठवले होते. लॉ अँड क्राइमने कॅरोल काउंटीच्या गुन्हेगारी तक्रारीचा हवाला देऊन अहवाल दिला आहे की, क्रॉसने तिच्या लग्नाच्या अगदी स्नॅपचॅटद्वारे जानेवारी ते मे 2022 दरम्यान एका मुलाला आणि जानेवारी ते जून 2023 दरम्यान इतर दोघांना 'जाणूनबुजून' अश्लील साहित्य पाठवले. (हेही वाचा: Female Teacher's Sex With Student: अल्पवयीन मुलासोबत शेतात लैंगिक संबंध; मास्तरीण बाईंच्या शिकवणीवर आजीवन बंदी)

तसेच तिने मे 2022 मध्ये एका 13 वर्षाच्या मुलासोबत अश्लील कृत्ये केली. पुढे क्रॉसने 17 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 दरम्यान एका 14 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केले. महत्वाचे म्हणजे क्रॉस ही आयकेएम मॅनिंग स्कूलमध्ये 'बाल अत्याचाराची रिपोर्टर' देखील होती. आता क्रॉसला 11 मार्च रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे, जिथे तिला जास्तीत जास्त 33 वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल. अहवालानुसार, क्रॉसने तिच्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात अनेकवेळा ‘उत्कृष्ट शैक्षणिक यश’ प्राप्त केले आहे. ती आयकेएम मॅनिंग गर्ल्स ट्रॅक अँड फील्ड संघाची धावपटूही होती.