Sex Crimes: अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; 23 वर्षीय शिक्षकास अटक

ओडिसी इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड अँड इंटरनॅशनल स्टडीज हायस्कूलमधील माजी हायस्कूल शिक्षिका आणि ॲथलेटिक प्रशिक्षक, ॲलिसा टॉड यांना 15 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अयोग्य वर्तन केल्याच्या (Teacher Student Relationship) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Sex Crimes | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ओडिसी इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड अँड इंटरनॅशनल स्टडीज हायस्कूलमधील माजी हायस्कूल शिक्षिका आणि ॲथलेटिक प्रशिक्षक, ॲलिसा टॉड यांना 15 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अयोग्य वर्तन केल्याच्या (Teacher Student Relationship) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ॲलिसा टॉड यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी 15 वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगीक शोषण (Sex Crimes) केले. अटक केलेल्या शिक्षिकेची तुरुंगात पाठवणी करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत झालेल्या तपासानुसार, टॉड आणि किशोरवयीन विद्यार्थ्यामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापीत झाल्याचा आरोप करणारी एक तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. विशेष म्हणजे ही तक्रार शिक्षिकेच्या पतीनेच 16 मार्च रोजी केल्याची प्राथमिक माहिती आहे. 12 न्यूज डॉट कॉमने दिलेल्या वत्तानुसार, शिक्षकाच्या पतीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर बुक्के पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी घरावर टाकलेल्या धाडीत आणि केलेल्या तपासावेळी शिक्षकाच्या ड्रॉवरमध्ये विद्यार्थ्याची लपवून ठेवलेली हस्तलिखीत पत्रे सापडली, ज्यामुळे पुढील छाननी सुरू झाली. टॉडा आणि विद्यार्थ्याच्या संवादानंतर दोघे कमीत कमी दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये कॅम्पसमध्ये आणि कॅम्पसच्या बाहेर गैरवर्तन करतानाचे पुरावेही सापडले आहेत. (हेही वाचा, यहूदी महिलांचा Sex Strike; ज्यू धर्मातील पारंपरीक कायद्यास अमेरिकेत विरोध; घ्या जाणून)

दरम्यान, शिक्षिकेकडे सापडलेल्या पुराव्यांची न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) चाचणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान शिक्षिका आणि अल्पवयीन विद्यार्थ्याचे कथित गैरवर्तनाचे अनेक तपशील पुढे आले. ज्यामध्ये टॉडाने विद्यार्थ्यासमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली. तसेच, विद्यार्थी जर तिच्यासोबत कायम राहाणार असेल तर तिच्या पतीलाही सोडण्याची तिची तयारी असल्याचेही ती त्याला सांगते. तिने विद्यार्थ्याला काही भेटवस्तू बेकायदेशीररित्याही दिल्याचे पुढे येते. (हेही वाचा, Erection Pills Side Effects: सेक्सदरम्यान पुरुषी शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या Viagra आणि Cialis ठरू शकतात घातक; ब्रिटनमध्ये 200 हून अधिक मृत्यू, अहवालात समोर आली धक्कादायक माहिती)

हे प्रकरण पुढे आल्यानंतर टॉडा हिच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि अल्पवयीन मुलासोबत लैंगिक वर्तन केल्याच्या आरोप केला जात आहे. आरोपांच्या फैरी झडताच ओडिसी फॅमिली ऑफ स्कूल्सने टॉडला तिच्या पदावरून काढून टाकले आहे. तिच्या कृतींचा निषेध केला आहे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर जोर दिला आहे.

दरम्यान, शिक्षकाकडून विद्यार्थ्यांचे शोषण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जगभरातील अनेक देशांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शालेय विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक शाळाही शिकाकांच्या या कृत्यावर तातडीने कारवाई करतात. मात्र, असे असले तरी अनेकदा अशी प्रकरणे पुढे न आल्याने दबली जातात आणि पीडितांना न्यायही मिळत नाही. आरोपी मोकाट सुटतात.