Serial Rapist: बलात्काराच्या 90 गुन्ह्यांसाठी व्यक्तीला 42 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा; शालेय विद्यार्थिनी आणि लहान मुलांना केले होते लक्ष्य

शिक्षा सुनावताना न्यायालयाने सांगितले की, फाकाथी तुरुंगातून बाहेर येऊ नये म्हणून त्याला इतकी कठोर शिक्षा दिली जात आहे.

Representational Image (Photo Credits: File Image)

दक्षिण आफ्रिकेतील (South African) एका सीरियल रेपिस्टला (Serial Rapist) अल्पवयीन मुलींवर अत्याचारासह बलात्काराच्या 90 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. त्यानंतर त्याला 42 जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. नकोसिनाथी फाकाथी (Nkosinathi Phakathi) असे या आरोपीचे नाव असून तो 40 वर्षांचा आहे. त्याने 2012 ते 2021 या नऊ वर्षांच्या कालावधीत जोहान्सबर्गच्या पूर्वेकडील एकुरहुलेनी (Ekurhuleni) परिसरात हे सर्व गुन्हे केले. त्याने अनेक शाळकरी विद्यार्थिनींना लक्ष्य केले. काहींवर शाळेत जाताना किंवा परत येताना अत्याचार केले तर, काहींवर त्यांच्या घरात घुसून बलात्कार केला.

शुक्रवारी, जोहान्सबर्ग उच्च न्यायालयात सुनावणी झाली व बलात्कार, अपहरण, प्राणघातक हल्ला आदी प्रकरणांमध्ये त्याला 42 जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा सुनावताना न्यायालयाने सांगितले की, फाकाथी तुरुंगातून बाहेर येऊ नये म्हणून त्याला इतकी कठोर शिक्षा दिली जात आहे. न्यायालयात निकाल देताना न्यायाधीश लेसेगो माकोलोमाक्वे यांनी फकाथीच्या कृत्यांचा निषेध केला. तरुण, निष्पाप, निराधार मुलींवर अत्याचार करण्याचे फाकाथीचे कृत्य अत्यंत घृणास्पद असल्याचे न्यायमूर्ती म्हणाले.

न्यायाधीशांनी मान्य केले की फाकाथीने त्याच्या कृत्यांबद्दल कोणताही पश्चात्ताप दाखवला नाही आणि त्यामध्ये सुधारणाही होऊ शकत नाही. साधारण 9 ते 44 वर्षे वयोगटातील लोक त्याच्या क्रूरतेचे बळी ठरले. त्याचे बहुतेक बळी हे शाळकरी मुले होती. तो अनेक दिवस मुलांवर लक्ष ठेवायचा व नंतर त्यांचे अपहरण करून तो आपला डाव साधायचा. एवढेच नाही तर तो मुलांवर बलात्कार होताना पाहण्यासाठी इतर मुलांवर जबरदस्ती करत असे. (हेही वाचा: West Bengal: ट्यूशनवरून घरी परतनाऱ्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह, आंदोलनासाठी नागरिक रस्त्यावर)

फाकाथीने त्याच्या काही पीडितांना त्यांच्याच घरात बलात्कार करून मारहाण केली. घरातील उपकरणे दुरुस्त करण्यासाठी इलेक्ट्रिशियन असल्याची बतावणी करत तो महिलांच्या घरात घुसत असे. 2021 मध्ये, जेव्हा त्याला अटक केली जात होती, तेव्हा पोलिसांनी गोळ्या झाडल्यानंतर त्याचा एक पाय कापावा लागला होता. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत महिला आणि मुलांविरोधातील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये आधीच मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आकडेवारीनुसार, दक्षिण आफ्रिकेत या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत लैंगिक शोषणाची 9,300 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.



संबंधित बातम्या