West Bengal: ट्यूशनवरून घरी परतनाऱ्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह, आंदोलनासाठी नागरिक रस्त्यावर

पश्चिम बंगालमध्ये एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी आंदोलन करण्यात आले आहे. मुलगी ट्यूशनमधून घरी जात होती,

West Bengal: ट्यूशनवरून घरी परतनाऱ्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह, आंदोलनासाठी नागरिक रस्त्यावर
Rape | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिची हत्या (Rape And Murder Case) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर  संतापलेल्या नागरिकांनी आंदोलन करण्यात आले आहे. मुलगी ट्यूशनमधून घरी जात होती, ज्यावेळीस तिला काही अज्ञातांनी तिचं अपहरण करून बलात्कार आणि तीची हत्या करण्यात आली. पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे. मुलगी चौथीचे शिक्षण घेत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. (हेही वाचा-वार्धक्य घालवणार, तारुण्य देणार', 'इस्रायल-निर्मित टाइम मशीन'चे आमिष दाखवून 35 कोटी रुपयांचा घोटाळा; कानपूर कपलचा प्रताप)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याचा एफआयआर नोंदवला होता.  शनिवारी सकाळी मुलीचा मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. कृपाखळी गंगा नदीच्या काठावर एका लहानग्या मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलीचा बलात्कार झाल्याचे अहवाल समोर आल्यानंतर गावकरी संतापले.

कुटुंब सदस्यांची प्रतिक्रिया

पोलिसांनी काही तासांच या घटनेचा छडा लावत आरोपीला अटक केले. त्याच्यावर आरोपीला पोलिसांनी कोठडीत ठेवले आहे. मुलीच्या अंगावर भरपूर जखमा असल्याचे समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख सुकांता मजुमदार यांनी या घटनेबाबत दु:खद शोक व्यक्त केला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. दरम्यान,   ऑगस्ट महिन्यात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या ही ताजी असताना शहरात आणखी एक घटना घडली.

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2024 09:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).