धक्कादायक! अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात खतरनाक Serial Killer; हस्तमैथुन करत आतापर्यंत केली 93 महिलांची हत्या
पोलिसांना दिलेल्या निवेदनात स्वत: सॅम्युएलने कबूल केले आहे की, त्याने आतापर्यंत 93 महिलांची हत्या केली आहे. या अहवालात त्याने एकूण 14 राज्यातील महिलांची हत्या केली असल्याचे समजते.
चालणे अशक्य, व्हीलचेयरवर बसलेला, डोक्यावरील व दाढीचे केस पांढरे झाले आहेत अशा एका वृद्ध व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्याला त्याची दया येईल, पण आपण मोठी चूक करत आहात. 78 वर्षीय सॅम्युअल लिटल (Samuel Little) अमेरिकेच्या (United States) इतिहासातील सर्वात धोकादायक सिरियल किलर (Serial Killer) असून, सध्या तो अमेरिकन पोलिसांच्या तावडीत आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात स्वत: सॅम्युएलने कबूल केले आहे की, त्याने आतापर्यंत 93 महिलांची हत्या केली आहे. या अहवालात त्याने एकूण 14 राज्यातील महिलांची हत्या केली असल्याचे समजते.
आपल्या गुन्ह्यांची कबुली देत सॅम्युएलने सांगितले की, तो रात्री उशिरा क्लबमधून परतणाऱ्या महिलांना आपल्या बोलण्यात फसवत असे. त्यानंतर त्यांना आपल्या सोबत घेऊन जाऊन त्यांना ठार मारत असे. आपल्या कारच्या मागील सीटवर सापळा रचून तो महिलांची गळा आवळून हत्या करीत असे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सॅम्युअल केवळ सेक्सुअली मोटिव्हेट होऊनच महिलांची हत्या करीत असे, परंतु तो स्वत: ला बलात्कारी समजत नाही. जर कोणी त्याला बलात्कारी म्हणून संबोधले तर त्याला प्रचंड राग येत असे.
सॅम्युएल मधुमेहाचा रुग्ण आहे आणि त्याचे शरीर खूप कमकुवत झाले आहे, परंतु आपल्या दुष्कर्मांबद्दल त्याला अजिबात खंत नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, तो इरेक्टाइल आजाराचा शिकार आहे व त्यामुळे तो कोणावरही बलात्कार करू शकत नाही. त्यामुळे हस्तमैथुन करत तो महिलांचा खून करत असे. एका तपासणी दरम्यान, डिटेक्टिव्ह मार्सिया आणि त्याचा सहकारी डिटेक्टिव्ह मिट्झी रॉबर्ट्सने 2 महिलांच्या हत्येचा उलगडा केला, या दरम्यान त्यांनी काही डीएनए गोळा केले. नंतर दोघांनी या डीएनएची सॅम्युएलच्या डीएनएशी पडताळणी केली. त्यानंतर सॅम्युएलचा संबंध या खुनांशी जोडला गेला. (हेही वाचा: रुग्णांचा रक्षकच ठरला रुग्णांचा भक्षक, 5 वर्षात घेतले 300 रुग्णांचे जीव)
सॅम्युएलने सांगितले की, त्याने 1970 ते 2005 पर्यंत त्याने बहुतेक खून केले आहेत. अमेरिकेची तपास एजन्सी एफबीआयने एक वेबसाइट तयार केली आहे, ज्यामध्ये हत्येच्या व्हिडिओंचे रेखाटनही दाखवले गेले आहे. सॅम्युअल तीन खुनांमध्ये दोषी आढळल्यानंतर 2014 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आतापर्यंत पोलिसांनी 30 खुनांचे पुरावे गोळा केले आहेत.