रुग्णांचा रक्षकच ठरला रुग्णांचा भक्षक, 5 वर्षात घेतले 300 रुग्णांचे जीव

डेलमेनहोर्स्ट रुग्णालयातील एक नर्साने (रुग्णसेवक) गेल्या 5 वर्षात 300 लोकांचे जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

रुग्णांचा रक्षकच ठरला रुग्णांचा भक्षक, 5 वर्षात घेतले 300 रुग्णांचे जीव
nurse Neils Hogel (Photo Credit: Getty)

डेलमेनहोर्स्ट रुग्णालयातील एक नर्साने (रुग्णसेवक) गेल्या 5 वर्षात 300 लोकांचे जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नील्स होगेल असे या आरोपीचे नाव आहे. ह्या रुग्णातील प्रशासनाला हे तेव्हा लक्षात आले, जेव्हा त्यांच्या देखरेखीत असलेल्या रुग्णांचा मृत्यू होऊ लागला. तोच रुग्णांना औषधांचा ओव्हरडोस देऊन मारायचा, अशी शंका रुग्णालय प्रशासनाला येतेय.

जर्मनीत राहणारा 42 वर्षीय नर्स होगेल एका नर्सच्या ओळखीवर डेलमेनहोर्स्ट हॉस्पीटलमध्ये नोकरीला लागला होता. मात्र कालांतराना ह्या नर्सचे रुपांतर सिरियल किलरमध्ये झाले. त्याच्या देखरेखेखाली असलेल्या रुग्णांना ओव्हरडोस देऊन त्याने आतापर्यंत 300 रुग्णांना मारले असल्याचे रुग्णालय प्रशानसनाकडून सांगण्यात येतय. प्रशासनाला ही गोष्ट उघडकीस आणण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागला.

अधिका-यांना जर्मनी, पोलंड आणि तुर्कीवरुन 130 मृतदेह सापडले आहे. मात्र ह्या हत्यांमागचे नेमके कारण काय हयाचा अजून शोध सुरु आहे. नील्सने आपण 43 लोकांना मारले असल्याचा कबुली जबाब सुद्धा दिला आहे. तसेच त्याने इतर 52 लोकांना मारल्याचेही नाकारले आहे.

हस्तमैथुन करत दाबायचा गळा, ९०जणाचे घेतले प्राण; सीरियल किलर पोलिसांच्या ताब्यात

होगेल 2000 सालापासून येथा काम करत होता. मात्र अनेकदा त्यांची विक्षिप्त हालचाल देखील सर्वांना दिसायची. होगेल ला 2 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा दिली गेली आहे. त्याच्यावर अन्य 4 रुग्णांच्या हत्येचा तपास चालू आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2019 01:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).