SEPTA Train Catching Fire: अमेरिकेतील डेलावेअर काउंटीमध्ये सेप्टा ट्रेनला आग; 350 प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात यश (Watch Video)
आगीची घटना संध्याकाळी 6 वाजता घडली. ट्रेनमधील सर्व 350 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार, पेनसिल्व्हेनियातील रिडले पार्कमध्ये किमान सहा ट्रेन डब्यांना आग लागली.
SEPTA Train Catching Fire: अमेरिकेतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी (अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार) पेनसिल्व्हेनियातील रिडले पार्कमध्ये SEPTA (Southeastern Pennsylvania Transportation Authority) ट्रेनला आग लागली. आगीची घटना संध्याकाळी 6 वाजता घडली. ट्रेनमधील सर्व 350 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार, पेनसिल्व्हेनियातील रिडले पार्कमध्ये किमान सहा ट्रेन डब्यांना आग लागली. तथापि, आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
घटनास्थळ फिलाडेल्फियापासून 21 मिनिटे किंवा 16 मैल अंतरावर आहे. रिडले पार्कमध्ये SEPTA ट्रेनला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ट्रेनला आग लागल्याचं दिसत आहे. तसेच काही किलोमीटरवरून काळ्या धुराचे मोठे लोट दिसत आहेत. 350 प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला होता. (हेही वाचा -Shooting At School In Sweden: स्वीडनमधील ओरेब्रो येथील शाळेत गोळीबार; 5 जण जखमी)
स्टेशनजवळील विल्मिंग्टन/नेवार्क लाईन ट्रेनला आग लागली. सहा डब्यांच्या या ट्रेनमध्ये फिलाडेल्फियाहून विल्मिंग्टनला जाणारे सुमारे 350 प्रवासी होते. आगीचे कारण अद्याप तपासात आहे. या घटनेमुळे, अमट्रॅकहून विल्मिंग्टन, डेलावेअर आणि फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनियाला जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावल्या. (हेही वाचा -Sheikh Hasina's Heartfelt Message: वडिलांच्या ऐतिहासिक निवासस्थानाची जवामावकडून तोडफोड; माजी पंतप्रधान लेखीचा भावापूर्ण संदेश; वाचा सविस्तर)
SEPTA ट्रेनला आग, पहा व्हिडिओ -
सेप्टा ट्रेनमधील एका प्रवाशाने घटनेचे वर्णन करताना सांगितले की, जेव्हा ट्रेन फिलाडेल्फियाहून निघाली तेव्हा सर्व काही सामान्य होते. काही मिनिटांनंतर, रिडले पार्क आणि नॉरवुडच्या दरम्यान आल्यानंतर कोचमधून विचित्र वास येऊ लागला. ट्रेनच्या बाजूने धूर येत असल्याचे त्यांना दुसऱ्या कोचमध्ये हलवण्यात आले. इतर प्रवाशांना लक्षात आले की ट्रेनला आग लागली आहे. अखेर अधिकाऱ्यांनी दरवाजे उघडले आणि आम्ही खाली उतरलो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)