प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्यावर Amazon सीईओ जेफ बेजोस यांचा फोन फॅक करण्याचा आरोप सौदी कडून आली प्रतिक्रिया
इंग्रजी वृत्तपत्र द गार्डियन च्या रिपोर्टनुसार, प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी एक मेसेज जेफ बेजोस यांना केला होता
सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्यावर 2018 साली अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांचा फोन हॅक केल्याचा आरोप केला आहे. इंग्रजी वृत्तपत्र द गार्डियन च्या रिपोर्टनुसार, प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी एक मेसेज जेफ बेजोस यांना केला होता. त्यानंतर त्यांचा मोबाईल हॅक झाला होता. क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर शिंगटन मधील सौदी अॅम्बेसी ने ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, मिस्टर जेफ बेजोस यांच्या फोन हॅक करण्यामागे सौदी शाही परिवार आहे ही गोष्ट साफ चूक आहे. सध्या या वृत्तामुळे देशात चर्चा रंगल्या आहेत.
Jeff Bezos यांनी केलेल्या आरोपांनुसार सौदी सरकारने त्यांच्या फोनला अॅक्सेस केलं होतं. काही तासांतच त्यांची खाजगी माहिती मिळवली. अद्याप जेफ बेजोस यांच्या फोनमधून कोणत्या प्रकारची माहिती मिळवली आहे याची माहिती स्पष्ट झालेली नाही. मात्र त्यांच्या घटस्फोटानंतर ही माहिती समोर आली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही बातमी सार्वजनिक करण्यात आली आहे. ज्यामध्ये जेफ कडून टीव्ही अॅंकर लॉरेन सैनचीस यांना पाठवण्यात आलेले मेसेज देखील आहेत. बेकर यांनी केलेल्या चौकशीमध्ये मोहम्मद बिन सलमान यांच्या जवळच्या व्यक्तींचा समावेश आहे.
सौदी पत्रकार खगोशी यांची तुर्कीच्या सौदी दूतावासामध्ये हत्या करण्यात आली आहे. बेकरने लिहलं आहे की काही अमेरिकन लोकांनी या गोष्टीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे की सौदी सरकार बेजोस यांना मागील काही दिवसांपासून त्रास दिला जाण्याचे प्रयत्न केले जात होते.
सौदी दुतावास ट्वीट
अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस यांनी सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे. अव्वलस्थानी असलेल्या जेफ बेजोस यांची संपत्ती 109.9 अरब डॉलर इतकी आहे.