सरिता कोमातीरेड्डी या भारतीय वंशाच्या अमेरिकन अ‍ॅटर्नीची न्युयॉर्क मधील न्यायालयात डॉनल्ड ट्रम्प कडून नियुक्ती साठी नॉमिनेशन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकन सरिता कोमातीरेड्डी यांची अमेरिकेतील न्युयॉर्कमधील फेडरल कोर्ट मध्ये न्यायधीशपदी नियुक्ती करण्यासाठी नॉमिनेशन केले आहे.

राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप (Photo Credit-IANS)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकन सरिता कोमातीरेड्डी यांची अमेरिकेतील न्युयॉर्कमधील फेडरल कोर्ट मध्ये न्यायधीशपदी नियुक्ती करण्यासाठी नॉमिनेशन केले आहे. न्युयॉर्कमधील पूर्व भागात US District Court मध्ये त्यांची नेमणूक वकिल म्हणून करण्यासाठी हे नॉमिनेशन आहे. सरिता या Columbia Law School मध्ये न्यायशास्त्राच्या शिक्षिका आणि सरकारच्या वतीने खटला चालवणार्‍या वकील म्हणून देखील काम पाहतात.

सोमवार, 4 मे दिवशी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सरिता यांचं नॉमिनेशन US Senate मध्ये पाठवलं. अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी न्युयॉर्कमधील याच जिल्ह्यांत पूर्व न्यायाधीश ब्रेट कैवनॉ (Brett Kavanaugh) यांच्याकडे लिपिक म्हणून काम केलं आहे.

कोमातीरेड्डी सध्या Deputy Chief of General Crimes म्हणून न्युयॉर्कमध्ये काम पाहत आहेत. याआधी त्यांनी Deputy Chief म्हणून International Narcotics and Money Laundering आणि Computer Hacking and Intellectual Property Coordinator म्हणून काम पाहिले आहे. प्रतिष्ठित कॉलेज 'हॉवर्ड लॉ स्कूल' मधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी लॉ क्लर्क म्हणून काम केले आहे. दरम्यान 12 फेब्रुवारी दिवशी डॉनल्ड ट्र्म्प यांनी कोमातीरेड्डी यांची नियुक्ती न्युयॉर्कमधील पूर्व जिल्ह्यातील न्यायालयामध्ये जिल्हा न्याधीश करण्यासाठी नॉमिनेशन करणार असल्याची घोषणा केली होती.