रशियाच्या Sputnik Light लसीचा सिंगल डोस Coronavirus च्या सर्व स्ट्रेन्सवर परिणामकारक- RDIF
रशिया निर्मित सिंगल डोस स्पुटनिक लाईट व्हॅक्सिन कोविड-19 रुग्णांविरुद्ध 79.4 टक्के परिणामकारक असल्याची माहिती स्पुटनिक व्ही लसीचे रशियन डेव्हलपर्सने गुरुवारी दिली.
रशिया (Russia) निर्मित सिंगल डोस स्पुटनिक लाईट व्हॅक्सिन (Sputnik Light Vaccine) कोविड-19 रुग्णांविरुद्ध 79.4 टक्के परिणामकारक असल्याची माहिती स्पुटनिक व्ही (Sputnik-V) लसीच्या रशियन डेव्हलपर्सने गुरुवारी दिली. ही लस कोरोना व्हायरसच्या सर्व स्ट्रेन (Coronavirus All Strains) विरुद्ध प्रभावशाली असल्याचे लस निर्मात्यांचे म्हणणे आहे. स्पुटनिक लाईट ही लस म्हणजे स्पुटनिक व्ही लसीचा पहिला कॉम्पोनेंन्ट आहे, अशी माहिती रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (Russian Direct Investment Fund) दिली.
सिंगल डोस स्पुटनिक लाईट लस 79.4 टक्के परिणामकारक आहे. लस दिल्याच्या 28 दिवसानंतर हा डेटा गोळा करण्यात आला आहे. जगात इतर उपलब्ध असणाऱ्या डबल डोस लसीपेक्षा या सिंगल डोस लसीचे 80 टक्के प्रभावशाली असणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे RDIF चे म्हणणे आहे.
गमेलिया सेंटरमध्ये केलेल्या लॅब टेस्टनुसार स्पुटनिक लाईट कोरोनाच्या सर्व स्ट्रेन विरुद्ध प्रभावशाली आहे, असे RDIF ने सांगितले आहे. रशियामध्ये 5 डिसेंबर ते 15 एप्रिल दरम्यान आयोजित केलेल्या मास लसीकरण मोहिमेत सहभाग न घेतलेल्या व्यक्तींना या लसीचा सिंगल डोस देऊन त्यांद्वारे डेटा गोळा करण्यात आला आहे.
केवळ एका इंजेक्शनच्या आधारे अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून वाचवण्यात यश मिळेल. या सिंगल डोसमुळे मोठ्या संख्येतील लोकांना कमीत कमी वेळामध्ये लसीकरण करता येईल. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण आपण याद्वारे करु शकतो, असे RDIF चे सीईओ Kirill Dmitriev यांनी सांगितले. स्पुटनिक लाईट ही लस सर्व आंतरराष्ट्रीय पार्टनर्संना निर्यात करण्यात येईल जेणेकरुन त्या देशातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होऊन कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात मदत होईल, असे ते पुढे म्हणाले.
रशियातील Gamaleya National Research Center of Epidemiology and Microbiology यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाने स्पुटनिक लाईट या लसीला मान्यता दिली आहे. 21 फेब्रुवारी रोजी गमालिया सेंटर आणि आरटीआफने मिळून स्पुटनिक लाईटचा आढावा घेतला. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी रशिया, युएई आणि घाना मधील 7000 नागरिकांना लस देण्यात आली होती. (Sputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत)
दरम्यान, रशियातील स्पुटनिक व्ही या लसीला यापूर्वी मान्यता मिळाली असून जगातील विविध देशांमध्ये याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. अजून पर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक लोकांना स्पुटनिक व्ही लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.