Russia-Ukraine War: प्रतिकात्मक क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनेच 600 हून अधिक सैनिक ठार, रशियाचा दावा

दिवसेंदीवस हे युद्ध दोन्ही बाजूंकडून अधिक जीवित आणि वित्त हानीला निमंत्रण देत आहे. युक्रेनचे सुमारे 600 सैनिक प्रतिकारात्मक केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मारले गेल्याचा दावा रशियाने केला आहे.

Russia-Ukraine War. (Photo Credits: Twitter)

रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) अद्यापही सुरुच आहे. दिवसेंदीवस हे युद्ध दोन्ही बाजूंकडून अधिक जीवित आणि वित्त हानीला निमंत्रण देत आहे. युक्रेनचे सुमारे 600 सैनिक प्रतिकारात्मक केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मारले गेल्याचा दावा रशियाने केला आहे. आमच्या सहकारी इंग्रजी संकेतस्थळाने वृत्तसंस्थेच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, युक्रेनियनच्या ताब्यात असलेल्या डॉनबासमधील क्रॅमतोर्स्क (City of Kramatorsk in the Donbass) शहरात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात कीवच्या 600 हून अधिक सैनिक ठार झाले, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने (Defence Ministry of Russia) दावा केला आहे.

नवीन वर्षाच्या रात्री डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक (डीपीआर) मधील मेकेयेव्का शहरात रशियन सैनिकांना राहणाऱ्या तात्पुरत्या गृहनिर्माण क्षेत्रावर युक्रेनने केलेल्या “गुन्हेगारी हल्ल्याला” प्रत्युत्तर म्हणून रविवारी करण्यात आलेला बॉम्बस्फोट हा “सूड घेण्याची कारवाई” होती, असे एका निवेदनात मंत्रालयाने म्हटले आहे.

युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात रशियाने म्हटले आहे की, युक्रेनेने केलेल्या 'गुन्हेगारी हल्ल्या'चा रशियाने बदला घेतला. रशियाने रविवारी केलेल्या 'प्रतिकात्मक हल्ल्यात' ही कारवाई करण्यात आली. रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला हा केवळ प्रतिकात्मक होता. त्यात केवळ सूड घेण्याची भावना होती, अशी प्रतिक्रिया रशियन मंत्रालयाने दिली. तसेच, रशियाने केलेला हल्ला हा युक्रेनने तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या इमारतींवर करण्यात आल्याचेही रशियाने म्हटले. (हेही वाचा, Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये Dnipropetrovsk प्रदेशात रशियाचा रात्रभर बॉम्बवर्षाव, 21 ठार; गव्हर्नर Valentyn Reznichenko यांची माहिती)

पाठिमागील 24 तासापासून रशियन सैन्य रशियन सैनिक असलेल्या ठिकाणांचा अचूक शोध घेऊन निशाणा लावत आहे. ज्यामुळे रशियन सैन्याचा पर्दाफाश होतो आहे. आमच्याकडील माहितीनुसार असे दिसून आले की शहरातील वसतिगृह क्रमांक 28 मध्ये 700 पेक्षा जास्त कीव सैनिक राहत होते, 600 हून अधिक वसतिगृह क्रमांक 47 मध्ये राहत होते, असेही रशियन मंत्रालयाने म्हटले आहे.

रशियन मंत्रालयाने पुणे म्हटले आहे की, 1 जानेवारी रोजी, सकाळी 0:01 वाजता, युक्रेनियन सैन्याने मेकेयेव्का शहरातील रशियन सैन्य असलेल्या तात्पुरत्या गृहनिर्माण क्षेत्राला लक्ष्य केले. यूएसने पुरवलेल्या HIMARS मल्टिपल रॉकेट लाँचरमधून इमारतीवर सहा क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यापैकी दोन रशियन हवाई संरक्षणाद्वारे रोखले गेले, परंतु चौघांनी ते पार केले, ज्यामुळे सुविधेचे मोठे नुकसान झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif