Russia-Ukraine Crisis: अखेरच्या प्रसारणात 'No To War' च्या मेसेजसह रशियाच्या टीव्ही चॅनलच्या संपूर्ण स्टाफने दिला On-Air राजीनामा

एका रशियातील टेलिव्हिजन चॅनलने संपूर्ण कर्मचाऱ्यांसह आपल्या अखेरच्या प्रसारणात 'नो टू वॉर' (No To War) च्या मेसेजसह लाइव्ह ऑन-एअर राजीनामा दिला. रशियाच्या अधिकाऱ्यांच्याद्वारे युक्रेन युद्धाच्या कवरेजसाठी टीव्ही रेन (TV Rain, Dozhd) चे संचालन निलंबित केले गेले.

Russian Army (Photo Credits: ANI)

Russia-Ukraine Crisis: एका रशियातील टेलिव्हिजन चॅनलने संपूर्ण कर्मचाऱ्यांसह आपल्या अखेरच्या प्रसारणात 'नो टू वॉर' (No To War) च्या मेसेजसह लाइव्ह ऑन-एअर राजीनामा दिला. रशियाच्या अधिकाऱ्यांच्याद्वारे युक्रेन युद्धाच्या कवरेजसाठी टीव्ही रेन (TV Rain, Dozhd) चे संचालन निलंबित केले गेले. त्यानंतर टीव्ही रेनच्या अधिकाऱ्यांनी लाइव्ह येत सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतला.(Russia-Ukraine War: रशियाकडून युक्रेनच्या Nuclear Power प्लांटवर हल्ला; जग चिंतेत, महत्त्वपूर्ण अपडेट)

टीव्ही रेन चॅनलच्या संस्थापकांपैकी एक नतालिया सिंदेयेवाने आपल्या अखेरच्या प्रसारणात नो टू वॉर मध्ये म्हटले की, आता चॅनलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्टुडिओ मधून वॉकआउट केले गेले. टीव्ही रेन चॅनलनंतर जाहीर केलेल्या विधानात असे म्हटले की, त्यांनी आपले ऑपरेशन अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. टीव्ही चॅनलच्या स्टाफने सामूहिक पद्धतीने दिलेल्या राजीनाम्याचा व्हिडिओ लेखर डेनियल अब्राहम यांनी लिंक्डइन वर शेअर केला आहे.

आपल्या संपूर्ण स्टाफने स्टुडिओ बाहेर पडल्यानंतर टीव्ही रेन चॅनलने स्वान लेक बॅले (Swan Lake Ballet) व्हिडिओ चालवला. जो 1991 मध्ये सोवित युनियनच्या पतनाच्या वेळी रशियात शासकीय टीव्ही चॅनलवर दाखवण्यात आला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

रशियातील एक अन्य मीडिया आउटलेट ईको मोस्किवी (Eko Moskvy/Echno Of Moscow) रेडियो स्टेशन सुद्धा युक्रेन युद्धाच्या कवरेजसाठी रशियाच्या अधिकाऱ्यांकडून टाकण्यात येणाऱ्या दबावामुळे बंद केले होते. या रेडिओ स्टेशनच्या संपादकांनी गुरुवारी असे म्हटले की, दबावामुळे आमच्या बोर्डाचा भंग केला आहे.

ईको ऑफ मॉस्कोचे प्रमुख संपादक अलेक्सी वेनेडिक्टोव यांनी या आठवड्यात न्यूज एजेंसी रॉयटर्स यांना असे म्हटले की, त्यांचे रेडिओ स्टेशन आपल्या स्वतंत्र संपादकिय लाइनला सोडणार नाही जो तीन दशकांपासून त्याची ओळख ठेवून आहे. त्यांनी घोषणा करत असे म्हटले की, आमच्या संपादकीय नितीत बदल होणार नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now