Russia Revolt: रशियात भाडोत्री सैनिकांचे बंड, 10 महत्त्वाच्या घडामोडी, Vladimir Putin, झेलेन्स्की Wagner Group प्रमुख येवगेनी काय म्हणाले? घ्या जाणून

रशियामध्ये राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना थेट आव्हान मिळाले आहे. हे आव्हान रशिया आणि पर्यायाने व्लादिमीर पुतिन यांनीच पाळलेल्या भाडोत्री सैनिकांच्या एका मोठ्या गटाकडून मिळाले आहे. वॅग्नर ग्रुप (Wagner Mercenary Group) असे या गटाचे नाव असून, येवगेनी प्रीगोझिन (Yevgeny Prigozhin) त्याचे प्रमुख आहेत.

Vladimir Putin, Yevgeny Prigozhin | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

रशिया पुन्हा एकदा बंडाच्या उंबरठ्यावर आहे. रशियामध्ये राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना थेट आव्हान मिळाले आहे. हे आव्हान रशिया आणि पर्यायाने व्लादिमीर पुतिन यांनीच पाळलेल्या भाडोत्री सैनिकांच्या एका मोठ्या गटाकडून मिळाले आहे. वॅग्नर ग्रुप (Wagner Mercenary Group) असे या गटाचे नाव असून, येवगेनी प्रीगोझिन (Yevgeny Prigozhin) त्याचे प्रमुख आहेत . येवगेनी यांनी दावा केला आहे की, त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरुन पुतिन यांना हटवले आहे आणि रशियाची राजधानी मॉस्कोवर ताबा मिळवला आहे. लवकरच देशाला नवा नेता मिळेल, असाही त्यांनी दावा केला आहे.

वॅग्नर ग्रुपने बंड केल्यापासून रशियाचे लष्कर आणि बंडखोर ग्रुप यांच्यात संघर्ष पाहायला मिळतो आहे. दरम्यान, वॅग्नर ग्रुपने दावा केला आहे की, त्यांनी रशियन लष्कराची तीन हेलीकॉप्टर पाडली आहेत. आमच्या मार्गात जे काही, कोणी येईल त्यांना आपण बाजूला करु आणि पुढे जाऊ, असेही या गटाने म्हटले आहे.

ट्विट

सीएनएन मॉस्कोने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, काही लोक देशाशी विश्वासघात करत आहेत. ते गृहयुद्धाला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे रशिया त्यांना कधीही माफ करणार नाही. ते देशद्रोही आहेत.

ट्विट

दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी सांगितले की रशियाचे व्लादिमीर पुतिन बहुधा "खूप घाबरलेले" आहेत आणि मॉस्कोवर बंडखोर भाडोत्री सरसावल्याने ते कुठेतरी लपले आहेत. झेलेन्स्की यांनी राष्ट्राला दिलेल्या आपल्या दैनंदिन भाषणात सांगितले की पुतिन यांनी "हा धोका स्वतःच निर्माण केला आहे."



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif