Russia-Ukraine War: रशियाचा युक्रेनवर पुन्हा ड्रोन हल्ला; 400 हून अधिक ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्रे डागली

रशियाने रात्रीच्या वेळी जवळजवळ संपूर्ण युक्रेनवर 400 हून अधिक ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्रे डागली. एका सर्वात मोठ्या हवाई बॉम्बहल्ल्यात किमान सहा जण ठार झाले आणि 80 जण जखमी झाले. या विनाशकारी हल्ल्यात कीव, ल्विव्ह आणि सुमीसह नऊ प्रदेश प्रभावित झाले.

Russia-Ukraine War: रशियाचा युक्रेनवर पुन्हा ड्रोन हल्ला; 400 हून अधिक ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्रे डागली
Russia launches drone attack on Ukraine (Photo Credit - X/@StratcomCentre)

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर पुन्हा ड्रोन हल्ला (Drone Attack) केला आहे. युक्रेनच्या ऑपरेशन स्पायडरवेबला प्रत्युत्तर म्हणून रशियाने रात्रीच्या वेळी जवळजवळ संपूर्ण युक्रेनवर 400 हून अधिक ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्रे डागली. एका सर्वात मोठ्या हवाई बॉम्बहल्ल्यात किमान सहा जण ठार झाले आणि 80 जण जखमी झाले. या विनाशकारी हल्ल्यात कीव, ल्विव्ह आणि सुमीसह नऊ प्रदेश प्रभावित झाले. युक्रेनियन अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी याबाबत एक्सवर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'आज, आपल्या देशातील विविध प्रदेश आणि शहरांमध्ये दिवसभर बचाव आणि आपत्कालीन ऑपरेशन्स सुरू राहिले. रशियन लोकांनी 400 हून अधिक ड्रोन, 40 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात 80 लोक जखमी झाले असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दुर्दैवाने, जगातील प्रत्येकजण अशा हल्ल्यांचा निषेध करत नाही. पुतिन नेमके हेच करतात. ते युद्ध करत राहण्यासाठी स्वतःसाठी वेळ विकत घेत आहेत.'

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये युक्रेनवर रशिया क्षेपणास्त्र डागताना दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावरील अलिकडच्या युक्रेनियन हल्ल्याबद्दल त्यांचे समकक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर काही काही तासांतच रशियाने युक्रेनवर हल्ला केला. तथापि, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, सुमारे एक तास आणि 15 मिनिटे चाललेल्या या कॉल दरम्यान त्यांनी रशियाच्या डॉक केलेल्या विमानांवर झालेल्या हल्ल्यासह इतर हल्ल्यांबद्दल चर्चा केली. युक्रेनने रशियावर केलेल्या हल्लाला आता रशिया प्रत्युत्तर देत असल्याचं दिसून येत आहे.

झेलेन्स्की यांनी दिली ड्रोन हल्ल्याची माहिती - 

वृत्तानुसार, युक्रेनियन संरक्षण दलांना सुमारे 30 क्षेपणास्त्रे आणि 200 ड्रोन रोखण्यात यश आले. रशियाच्या कृतींचा निषेध करताना झेलेन्स्की पुढे म्हणाले, 'रशियन लोक त्यांच्या युद्धासाठी अधिक दबाव येऊ नये म्हणून जगाच्या एकतेत फूट पाडण्याचा सतत प्रयत्न करतात. आपल्याला हे काम स्पष्टपणे दिसले पाहिजे. देशात शांतता प्रस्थापित करायला हवी. त्यासाठी सुरुवातीची पावले उचलण्याची गरज आहे, विशेषतः युद्धबंदी. ते घडवून आणण्यासाठी आणि हल्ले थांबवण्यासाठी रशियावर दबाव आणला पाहिजे.'

(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2025 03:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).