Joe Biden, Vladimir Putin (PC - Facebook)

यूक्रेनसोबत (Ukraine Crisis) सुरु असलेल्या वादात रशियाचे (Russia) राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पूर्व युक्रेनच्या दोन बंडखोर आणि फुटीरवादी प्रदेशांना थेट स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला आहे. त्यामुळे युक्रेनमधून Donetsk (डोनेस्तक) आणि Lugansk (लुगांस्क) असे दोन देश निर्माण झाले आहेत. अर्थात जगभरातील देशांची यास कशी संमती आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अमेरिकेने मात्र रशियाच्या या निर्णयास विरोध दर्शवला आहे. पश्चमी देशांनी या निर्णयावरुन रशियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही रशियाने हा निर्णय घेतलाच. त्यामुळे पश्चिमी देश आणि यूक्रेन व रशिया यांच्यातील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेस्की यांनी म्हटले की, आता अराजकीय तत्वांविरोधात कारवाई न करण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही यापुढेही अशाच पद्धतीने उभे ठाकण्यासाठी सर्व काही करु. आम्ही शांततापूर्ण मार्गाने बोलणी पुढे ठेवण्याच्या विचारांचे आहोत. आम्ही याच मार्गावरुन पुढे जाऊ. आम्ही आमच्या भूभागावर आहोत. आम्ही कोणालाही घाबरत नाही. आम्ही कोणाचीही बाकी ठेवली नाही. आता आम्ही कोणाला काहीही देणार नाही.