Iraq संसद अध्यक्षांच्या घराजवळ रॉकेट हल्ला, 2 जखमी

मंगळवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हे दोघे लहान मुले असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तसंस्था एएफपीने म्हटले आहे की, तीन तीन कत्यूषा रॉकेट (Katyusha Rockets) राजधानी बगादाद येथील पश्चिमी अनबर प्रांतातील गुरमा जिल्ह्यात डागण्यात आली.

Rocket attack | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

इराक (Iraq) संसदेच्या अध्यक्षांच्या ( Speaker of Parliament) घराजवळ रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हे दोघे लहान मुले असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तसंस्था एएफपीने म्हटले आहे की, तीन तीन कत्यूषा रॉकेट (Katyusha Rockets) राजधानी बगादाद येथील पश्चिमी अनबर प्रांतातील गुरमा जिल्ह्यात डागण्यात आली. ही रॉकेट्स संसद अध्यक्ष मोहम्मद अल-हलबुसी ( Mohammed al-Halbussi) यांच्या घरापासून साधारण 500 मीटर (1,640 फूट) अंतरावर डागण्यात आली.

सांगितले जात आहे की, मुख्य न्यायालयाने संसद अध्यक्षांच्या रुपात मोहम्मद अल-हलबुसी ( Mohammed al-Halbussi) यांना निवडल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही निवड झाल्याची निश्चिती माहिती पुढे आल्यानंतर काही वेळातच हा हल्ला करण्यात आला. हलबुसी हेच हल्लेखोरांचे प्रमुख लक्ष्य होते. मात्र, हल्ला झाला त्या वेळी ते घरी नव्हते. (हेही वाचा, Abu Dhabi Airport Attack: अबुधाबी विमानतळावर 3 ऑईल टॅंकर्सच्या आगीमागे ड्रोन हल्ल्याची शक्यता; Houthi ने स्वीकारली जबाबदारी (Watch Video))

सांगितले जात आहे की, इराकच्या मूख्य न्यायालयाने अध्यक्ष म्हणून त्यांना दुसऱ्यांदा निवडले आहे. त्यामुळे ही निवड झाल्याच्या काहीच काळात हा हल्ला करण्यात आला. सूत्रांच्या हवाल्यात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, हल्ला झाला त्या वेळी हलबुसी हे घरी होते किंवा नाही याची पुष्टी होऊ शकली नाही.