पाकिस्तानला भीती, भारत दुप्पटीने परमाणू बॉम्ब हल्ला करुन आपल्याला संपवेल- परवेज मुशर्रफ
पाकिस्तानचे (Pakistan) माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांनी पाकिस्तानने आपल्या बाजूच्या देशावर एक जरी परमाणू हल्ला केल्यास भारत (India) 20 परमाणू बॉम्ब (Nuclear Weapon) हल्ला करुन आपल्याला संपवेल अशी भीती बाळगली आहे.
पाकिस्तानचे (Pakistan) माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांनी स्वत:च्या देशावर एक जरी परमाणू हल्ला केल्यास भारत (India) 20 परमाणू बॉम्ब (Nuclear Weapon) हल्ला करुन आपल्याला संपवेल अशी भीती बाळगली आहे. याबाबत कराचीमधील डॉन वृत्तपत्राने माहिती दिली आहे. तर शुक्रवारी संयुक्त अरब अमीरत (UAE) येथे एका पत्रकार परिषदेत मुशर्रफ यांनी असे म्हटले की, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध खतरनाक स्तरावर पोहचले आहेत.परंतु परमाणु हल्ल्याबाबत त्यांनी उघडपणे काही स्पष्ट केले नाही.
भारतावर जर पाकिस्तानने एक परमाणु बॉम्ब हल्ला केल्यास भारत आपल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी 20 परमाणू बॉम्ब हल्ले करुन आपल्याला नष्ट करुन टाकेल अशी भीती आता पाकिस्तानला सतावू लागली आहे. त्यामुळे आता एकच उपाय असून आपण भारतावर 50 परमाणू बॉम्ब हल्ला केल्यास भारत फक्त 20 परमाणू बॉम्ब हल्ल्यात आपल्याला नष्ट करु शकणार नसल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. (हेही वाचा-Pulwama Terror Attack: भारताने पाणीकोंडी केली तरी आम्हाला फरक पडत नाही- पाकिस्तानची प्रतिक्रिया)
मात्र जर भारताने पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्याचे ठरविले तर पाकिस्तानच्या सेनेला त्यापूर्वीच युद्धासाठी तयार राहणे आवश्यक आहे. तसेच भारत काश्मिर येथे कोणताही हल्ला करणार असल्यास पाकिस्तानही सिंध आणि पंजाबमधील अन्य भागात हल्ला करुन भारताला धडा शिकवेल असे ही मुशर्रफ यांनी म्हटले आहे.