Priti Patel बनल्या ब्रिटनच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या पहिल्या गृहमंत्री

साजिद नव्या सरकारमध्ये आता अर्थ खात्याचा भार सांभाळणार आहे. प्रीती यांनी गृह खात्याची जबाबदारी हा त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.

File image of Priti Patel | (Photo Credits: Getty Images)

ब्रेक्झिट करारानंतर लंडनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. थेरेसा मे (Theresa May) या महिला पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर लंडनच्या पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) यांची वर्णी लागली आहे. आता त्यांच्या मंत्रिमंडळातील (UK Cabinet) खासदारांची नावं सामोर आली आहेत. यामध्ये गृहमंत्रीपदी भारतीय वंशाच्या प्रिती पटेल (Priti Patel) यांची निवड झाली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी विराजमान होणार्‍या प्रिती या भारतीय वंशाच्या पहिला नागरिक आहेत. पाकिस्तानी मूळाचे साजिद जावेद यांच्या जागी प्रितीची निवड करण्यात आली आहे. साजिद नव्या सरकारमध्ये आता अर्थ खात्याचा भार सांभाळणार आहे. प्रीती यांनी गृह खात्याची जबाबदारी हा त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. भारताचे जावई झाले इंग्लंड चे नवे पंतप्रधान, आज घेणार पदाची सूत्रे हातात; जाणून घ्या काय आहे हे नाते

राजकीय कारकीर्द

भारताकडून कौतुक

ब्रिटनमध्ये 'बॅक बोरिस' या हुजूर पक्षाच्या अभियानातही त्यांचा समावेश होता. प्रीती पटेल यांचे कुटुंबीय गुजराती आहे. युगांडा मशून त्याचे आई वडील इंग्लंडमध्ये आले.



संबंधित बातम्या