व्लादिमीर पुतिन रशियाचे तहहयात राष्ट्रपती होण्याची शक्यता; राज्यघटना बदलण्याचे संकेत

त्यामुळे येत्या काळात रशिया (Russia) बऱ्याच मोठ्या संघर्षातून जाण्याची शक्यता दिसत आहे. तसेच, पुतिन आपली सत्ता कायम राखणार का याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

Russian President Vladimir Putin | (Photo credit: kremlin.ru)

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांनी रशियाच्या संसदेसमोर राज्यघटनेत बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार व्लादिमीर पुतिन यांचा रशियाचे राष्ट्रपती म्हणून तहहयात राष्ट्रपती राहण्याचा मानस आहे. पुतीन यांचा प्रस्ताव न पटल्याने पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळानेच राजीनामा दिला आहे. पुतीन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणानंतर मेदवेदेव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात रशिया (Russia) बऱ्याच मोठ्या संघर्षातून जाण्याची शक्यता दिसत आहे. तसेच, पुतिन आपली सत्ता कायम राखणार का याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी मार्च 2018 मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बाजी मारत विजय मिळवला होता. त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या राजकीय कारकिर्दीतील हा चौथा विजय होता. विद्यमान स्थिती व्लादिमीर पुतिन यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 2024 पर्यंत आहे. माजी पंतप्रधान Mikhail Kasyanov यांनी पुतिन यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, ते केवळ संविधानामध्ये बदल करु इच्छितात कारण त्यांना कायमस्वरुपी राष्ट्रपती पदावर राहता यावे. संविधानानुसार पुतिन हे पुढच्या वेळी निवडणूक लढवू शकत नाहीत. (हेही वाचा, US Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना)

पंतप्रधान मेदवेदेव यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रशियाच्या सुरक्षा समितीचे उप सेक्रेटरी पद देण्याची घोषणा करण्यात आली होती. पुतीन यांनी म्हटले आहे की, रशियाच्या समितीने मेदवेदेव यांना उपसेक्रेटरी पद देण्याचे ठरवले आहे. दरम्यान, पुतीन यांनी संसदेसमोर प्रस्ताव ठेवला आहे की, राज्यघटनेत बदल करण्यात यावा. मात्र, घटनेत हा बदल जेव्हा होईल तेव्हा, तो केवळ संविधानतील बदल असणार नाही. तर, सत्तेचा आणि अधिकारांमध्येही मोठा बदल होईल. त्यामुळे देशाला वेगळेच वळण मिळेल असे सांगत विद्यमान मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे.