PNB Scam: नीरव मोदी याचा जामीन अर्ज ब्रिटन न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळला
पंजाब नॅशनल बँकेला (PNB) कोट्यावधींचा चुना लावून विदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याचा जामीन अर्ज ब्रिटन न्यायालयाने (UK Court) पुन्हा एकदा नाकारला आहे.
पंजाब नॅशनल बँकेला (PNB) कोट्यावधींचा चुना लावून विदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याचा जामीन अर्ज ब्रिटन न्यायालयाने (UK Court) पुन्हा एकदा नाकारला आहे. तर नीरव मोदी याचा जामीन अर्ज फेटाळण्याची ही तिसरी वेळ असून 24 मे पर्यंत आता न्यायालयीत कोठडी सुनावण्यात आली आहे.
वँडस्वर्थ कारागृहात नीरव मोदी हा गेल्या काही दिवसांपासून राहत आहे. तर लवकरच नीरव मोदी याच्या जामीनाप्रकरणी सविस्तर सुनावणी 30 मे रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मार्च 30 रोजी नीरव मोदी याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याला 26 एप्रिल पर्यंत न्यायालयीत कोठडी सुनावणी आली होती.(PNB Scam: लंडन कोर्टाने नीरव मोदी ह्याच्या जामिनाचा अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला)
मात्र भारताची बाजू मांडणारे टॉबी कॅडमन (Toby Cadman) यांनी एका साक्षीदाराला धमकी देण्यात आली असल्याचे कोर्टात सांगितले होते. तसेच भारतीय तपास यंत्रणेलासुद्धा सहकार्य करत नसून त्याला जामिन मिळाल्यास प्रथम तो देश सोडून पळणार असल्याचे कॅडमन यांनी म्हटले होते. त्यामुळे जामिनासाठी केलेला अर्ज मंजुर करु नये असे त्यावेळी न्यायाधीशांच्या समोर सांगण्यात आले होते