भूकंप होत असताना देखील टीव्ही चॅनेलला मुलाखत देत होत्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न, पाहा काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडिओ

यावेळी त्यांच्या आजूबाजूच्या सर्व वस्तू हलताना दिसत आहे. मात्र जेसिंडा जराही न डगमगता आपल्या जागी उभ्या राहून शांतपणे मुलाखत देत होत्या.

PM Jesinda (Photo Credits: Youtube screenshot)

काही लोक आपल्या कामाशी इतके प्रामणिक असतात त्यासाठी कधीकधी ते आपला जीवही धोक्यात घालतात. यातीलच एक न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न (New Zealand’s Prime Minister, Jacinda Ardern). त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जेसिंडा वेलिंग्टन परिसरात होत आहे याबाबत माहिती देत होत्या. अचानक त्यांनी आपल्या डाव्या उजव्या बाजूला पाहून सांगितले की येथे भूकंप होत आहे.

या व्हिडिओमध्ये वृत्त निवेदकाशी बोलत असताना अचानक पंतप्रधान जेसिंडा जिथून बोलत होत्या तिथे भूकंप होत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांच्या आजूबाजूच्या सर्व वस्तू हलताना दिसत आहे. मात्र जेसिंडा जराही न डगमगता आपल्या जागी उभ्या राहून शांतपणे मुलाखत देत होत्या.

हेदेखील वाचा- कानठळ्या बसवण्याऱ्या आवाजाने हादरले बेंगळूरू; भूकंप झाली की विमान उडाले? पोलिसांचा तपास सुरु

न्यूझीलंडच्या महासागरात 'रिंग ऑफ फायर' क्षेत्र येते. येथे अनेकदा भूकंपाचे धक्के बसत असल्यामुळे या जागेला अस्थिर द्विपही सांगितले जाते. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षणानुसार, सोमवारी येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 5.6 इतकी होती. याचे केंद्र उत्तरपूर्व वेलिंगटन पासून 100 किमी दूर समुद्राच्या खोल होते. मात्र यामुळे कोणत्याही प्रकारची वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नाही.