दिलासादायक! Pfizer आणि Moderna च्या कोविड-19 विरोधी लसीमुळे संसर्ग होण्याचा धोका 91 टक्क्यांपर्यंत कमी- Study

अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या लोकांनी फाइजर (Pfizer) आणि मॉडर्नाची (Moderna) कोविड-19 विरोधी लस (Covid-19 Vaccine) घेतली आहे, त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 91 टक्क्यांपर्यंत कमी आहे.

Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या लोकांनी फाइजर (Pfizer) आणि मॉडर्नाची (Moderna) कोविड-19 विरोधी लस (Covid-19 Vaccine) घेतली आहे, त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 91 टक्क्यांपर्यंत कमी आहे. अभ्यासानुसार या लसींच्यामुळे लोकांमध्ये लक्षणांची तीव्रता आणि संसर्ग कालावधी कमी होतो. हा अभ्यास 30 जून रोजी 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित झाला आहे. फायझर आणि मॉडर्नाच्या एमआरएनए लसमध्ये लोकांच्या पेशींसाठी सार्स-सीओवी-2 चे स्पाइक प्रोटीन बनवण्याची अनुवांशिक शक्ती आहे.

विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करून तो संक्रमित करण्यासाठी सार्स सीओवी-2 चा वापर करतो. अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, 'आमची रोगप्रतिकारक शक्ती स्पाइक प्रोटीनविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करते आणि त्यावरून हे समजते की, भविष्यकाळात कोरोना विषाणूचा सामना कसा करावा.

फ्रंटलाइन वर्कर्स, डॉक्टर आणि परिचारिका यांच्यातील संसर्गाचा धोका व त्याचे प्रमाण मोजण्यासाठी हा अभ्यास केला गेला. प्रोफेसर युन म्हणाले, 'हे असे लोक आहेत जे दररोज व्हायरसच्या संपर्कात येत आहेत आणि लसीने त्यांना या आजारापासून वाचवले. दुर्दैवाने लसीकरण करूनही ज्यांना कोविड-19 ची लागण झाली, अशा लोकांची स्थिती लस न घेतलेल्या लोकांपेक्षा बरी होती. अभ्यासात असे दिसून आले आहे की, दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर सहभागींचे 'संपूर्ण लसीकरण' झाल्यानंतर एमआरएनए कोविड-19 लस संक्रमणाचा धोका कमी करण्यात 91 टक्के प्रभावी होती. (हेही वाचा: 'Covid-19 च्या अत्यंत धोकादायक टप्प्यावर आहे जग, जवळपास 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा उद्रेक'; WHO ने व्यक्त केली चिंता)

अभ्यासात असेही आढळले आहे की, पहिल्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर 'अंशिक’ लसीकरण हे संक्रमणाचा धोका कमी करण्यात 81 टक्के प्रभावी होते. अभ्यासात 3,975 सहभागींचा समावेश होता. ज्या सहभागींना पूर्ण किंवा अंशतः लसी दिली गेली होती त्यांच्यात लसी न घेतलेल्या लोकांपेक्षा सौम्य लक्षणे आढळली. ज्या लोकांचे लसीकरण झाले आहे अशांना विषाणूची लागण झाल्यानंतर ताप येण्याचा धोका 58 टक्के कमी झाला आहे.