Suicide Attempt in Flight: Bangkok ते London EVA Air flight मध्ये प्रवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न
लंडनच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7.30 ला विमान उतरले आणि विमानतळापासून हॉस्पिटल पर्यंत नेण्यासाठी व्यवस्था सज्ज ठेवली होती.
EVA Air flight च्या Bangkok ते London फ्लईटचे लंडनच्या Heathrow Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आलं आहे. ही शुक्रवार 15 मार्चची घटना आहे. विमानात वॉशरूममध्ये प्रवाशाने आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केला असल्याची माहिती The Metro च्या रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. विमान उतरण्याच्या वेळेस वॉशरूम वापरण्यावर बंदी असते पण एक प्रवासी जागेवर नसून वॉशरूम मध्ये असल्याचं केबिन क्रू च्या लक्षात आलं. न्यूज रिपोर्ट नुसार जेव्हा या व्यक्तीला तपासण्यात आलं तेव्हा त्याने आत्म्हत्येचा प्रयत्न केला असल्याच्या स्थितीत तो आढळला. नक्की वाचा: Man Stuck In Loo For Entire Flight: मुंबई- बेंगलोर फ्लाईट मध्ये प्रवासी सुमारे 100 मिनिटं अडकला टॉयलेट मध्येच!
दरम्यान या प्रवाशाने आत्महत्येचा प्रयत्न का केला? किंवा त्याची ओळख याची माहिती समजू शकलेली नाही. विमानातील क्रू आणि डॉक्टरांनी या व्यक्तीला प्रथमोपचार दिले. लंडनच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7.30 ला विमान उतरले आणि विमानतळापासून हॉस्पिटल पर्यंत नेण्यासाठी व्यवस्था सज्ज ठेवली होती. त्यानंतर प्रवाशाची स्थिती कशी आहे हे समजू शकलेले नाही. EVA Air कडून या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे पण तपशील देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली आहे. नक्की वाचा: Air India: महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये प्रवेश दिल्याने एअर इंडियाचा पायलट अडचणीत, वर्षातील दुसरी घटना.
जानेवारी महिन्यातही Ryanair flight देखील प्रवाशांमधील भांडणामुळे अचानक वळवण्यात आले होते. हे विमान युके ते स्पेन प्रवास करताना दारूच्या नशेत काहींनी गोंधळ घातला होता. त्यामध्ये एका केबिन क्रु सोबतही चूकीचं वर्तन केलं. त्यानंतर झालेल्या भांडणात एक जण बेशुद्ध पडल्याने विमान वळवण्यात आलं.